Dragon Fruit Cultivation: व्हीएतनामच्या धर्तीवर कसमादेत ड्रगन फ्रूटची शेती! राज्यातील शेतकऱ्यांकडून दौरा

Farmer Neighbor Arun Deore, Dr. while showing jumbo red dragon fruit. Madhukar potdar.
Farmer Neighbor Arun Deore, Dr. while showing jumbo red dragon fruit. Madhukar potdar.esakal
Updated on

Dragon Fruit Cultivation : व्हिएतनाम हे ड्रगन फ्रूट शेतीचे माहेरघर आहे. आपल्या भागात देखील या फळांची संपूर्ण माहिती घेत शेती करण्याच्या उद्देशाने कसमादेतील शेतकऱ्यांनी व्हिएतनाम गाठून तेथील ड्रॅगन फ्रूट शेतीची माहिती जाणून घेतली.

लागवड, पिकाची निगा, बाजारपेठ आदींची माहिती जाणून घेत आपल्या भागातही अशाच स्वरूपाच्या शेतीचा प्रयोग करण्याचा निर्धार यावेळी कसमादेतील शेतकऱ्यांनी व्यक्त केला. (Cultivation of dragon fruit in Kasmade on lines of Vietnam visit from farmers of state nashik)

कसमादेतील शेतकरी हे प्रयोगशील आहेत. डाळिंब हे त्यांचे हक्काचे पीक असले तरी येथे पेरु, आंबा, पपई, मोसंबी, ॲपल बोर, टरबूज, खरबूज, सीताफळ, अंजीर आदी फळांची शेती केली जाते.

यावेळी वेगळा प्रयोग म्हणून काही शेतकऱ्यांनी ड्रगन फ्रूटचा प्रयोग केला आहे. मात्र तो अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाला नाही. यामुळे महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघाचे उपाध्यक्ष कृषीभूषण अरुण देवरे, पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश कुलकर्णी, ड्रगन फ्रूट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मधुकर पोतदार आदींसह महाराष्ट्रातील २५ शेतकऱ्यांनी नुकताच व्हिएतनामचा दौरा केला.

तेथील होची सिंट या शहरापासून जवळच मोठ्या प्रमाणावर ड्रगन फ्रूटची शेती केली जाते. यावेळी शेतकऱ्यांनी रेड जम्बो ड्रगन शेतीची त्यांनी पाहणी केली.

होची सिंट येथे रेड जम्बो ड्रॅगनची लागवड बारा बाय आठ व दहा बाय आठ अशा अंतरावर करण्यात आली आहे. ड्रॅगन फ्रूट शेती करताना ५ फुटी पोलचा वापर करण्यात आला असून ते एक फुट जमिनीत व चार फुट वरती आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Farmer Neighbor Arun Deore, Dr. while showing jumbo red dragon fruit. Madhukar potdar.
Water Crisis: उद्भव कोरडे पडल्याने पाणीयोजना बंद! राजापूरला पावसाळ्यात हाल, गावासह वस्त्यावर टॅंकरने पुरवठा

रिंग किंवा चौकोनी फ्रेम ऐवजी वरती चार गज काढलेले आहेत. एका बाजूला एक फांदी या प्रमाणे चार फांद्या पोलवर विरुद्ध दिशेने टाकलेल्या असतात. दोघा बाजूंना दोन लॅटरल अशी या शेतीची रचना असते.

यावेळी येथील शेतकऱ्यांनी या फळपिकांची हॉर्टीकल्चर रिसॉर्ट इन्स्टिट्यूटमध्ये माहिती जाणून घेतली. यात ड्रॅगनवरील रोग, जाती, येणाऱ्या अडचणी, बाजारपेठ आदींची माहिती घेतली.

आठ दिवसाच्या या दौऱ्यात शेतकऱ्यांनी व्हिएतनामच्या विविध भागांना भेटी देवून तेथील शेती व इतर माहिती जाणून घेतली. व्हिएतनाम दौऱ्यावर गेलेले शेतकरी आपापल्या भागात ड्रगन शेतीबाबत जनजागृती शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहेत.

"ड्रगन फ्रूटला सध्या चांगली मागणी आहे. शेतकऱ्यांनी द्राक्षे, डाळिंब ऐवजी ड्रगन फ्रूटच्या शेतीकडे वळले पाहिजे. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे हे पीक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल. साबरवर संशोधन केलेले हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले आहे. सध्या शंभर ते २४० रुपये किलोने भाव आहे. तरुण शेतकऱ्यांनी पिकाचा अभ्यास करून ड्रगन शेती विकसित करावी."- अरुण देवरे, कृषीभूषण, दाभाडी

Farmer Neighbor Arun Deore, Dr. while showing jumbo red dragon fruit. Madhukar potdar.
Nashik News: ना हरकत दाखल्यासाठी मालेगावकरांना नाशिकला हेलपाटे मारण्याची वेळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.