PM Modi Nashik Visit : संस्कृती, चित्तथरारक कसरतींतून कौशल्याचे दर्शन; नाशिक ढोलचा निनाद

जिम्नॅस्टिक, मल्लखांब, योगासने, साहसी प्रात्यक्षिके करताना तरुणाईच्या उत्साहाने अन् देशभक्तिपर गीतांनी सांस्कृतिक कार्यक्रमात रंगत आली.
Young girls and boys of the Sahasrnad Dhol troupe playing drums at the opening ceremony of the Yuva Mahotsav. In the second photo, the youngster doing a thrilling workout.
Young girls and boys of the Sahasrnad Dhol troupe playing drums at the opening ceremony of the Yuva Mahotsav. In the second photo, the youngster doing a thrilling workout.esakal
Updated on

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुक्रवारी (ता. १२) उद्‌घाटन झाले. सोहळ्यात ‘विकसित भारत @२०४७ - युवा के लिए – युवा द्वारा’ संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

जिम्नॅस्टिक, मल्लखांब, योगासने, साहसी प्रात्यक्षिके करताना तरुणाईच्या उत्साहाने अन् देशभक्तिपर गीतांनी सांस्कृतिक कार्यक्रमात रंगत आली. (Culture Display of skills through breathtaking exercises PM Modi Nashik Visit news)

तपोवन मैदानावर स्वामी विवेकानंद जयंती युवा दिनानिमित्त २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. ‘सक्षम युवा - समर्थ भारत’ घोषवाक्यावर आधारित महोत्सवात तरुणाईचा जल्लोष, उत्साह ओसंडून वाहत आहे. देशातील विविध राज्यातील तरुणाईचा मेळा महोत्सवाच्या निमित्ताने शहरात अवतरला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन झाल्यानंतर भारताची विविधता, एकात्मता, संस्कृती, नृत्य व वेशभूषा यांचे दर्शन घडविणाऱ्या राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या चमूंचे व्यासपीठासमोर संचलन झाले.

संचलनात नाशिकच्या सहस्त्रनाद ढोल पथकातील युवक- युवतींनी ढोल वाजवत साथ-संगत केली.

Young girls and boys of the Sahasrnad Dhol troupe playing drums at the opening ceremony of the Yuva Mahotsav. In the second photo, the youngster doing a thrilling workout.
Nrendra Modi Nashik Visit: "मंदिर एकदम चकाचक तरी मोदींनी..."; ठाकरे गटाची खोचक टीका

सुमारे १० मिनिटे चाललेल्या संचलनात ढोल पथकाच्या निनादात परिसर दुमदुमला. ५० युवक- युवतींचा समावेश असलेल्या या ढोल पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं‌.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणात जिम्नॅस्टिकमध्ये हूप, बॉल, रिबन आणि रोप अशा साधनांचा वापर करत युवकांनी आपले कौशल्य दाखवत तालबद्ध जिम्नॅस्टिक सादर केले. तरूणांनी मल्लखांबावरील चित्तथरारक कसरतींतून उपस्थितांना आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले.

ढोल, झांज, लेझीम, कथक, भरतनाट्यम, भांगडा या विविध राज्यातील लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. ‘भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता‌.

Young girls and boys of the Sahasrnad Dhol troupe playing drums at the opening ceremony of the Yuva Mahotsav. In the second photo, the youngster doing a thrilling workout.
PM Modi Nashik Visit : कडेकोट सुरक्षेत पार पडला दौरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com