नाशिक : अंद्धश्रद्धा निर्मूलन समिती फक्त हिंदू धर्माविरोधात आवाज उठवत असल्याचा आरोप नाशिक येथील साधू महंतांनी केला आहे. या विरोधात नाशिकमधील साधू महंत आक्रमक झाले आहे. ज्याप्रमाणे हिंदूच्या चमत्कारांविरोधात आवाज उठविला जातो त्याचप्रमाणे इतर धर्मातही असे चमत्कार केले जातात, हे चमत्कार सिद्ध करणाऱ्यास नाशिक येथील महतांनी 51 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
जादूटोणाविरोधी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी नाशिकमधील साधू महंत आक्रमक झाले आहेत. अन्य धर्मीय, मजहब, पंथ, ख्रिश्चन आदि धर्मगुरू, मौलवी, पाद्री जे शक्ती असल्याचा दावा करून अनेक कॅन्सर, किडनी अनेक आजार बरे करण्याचे दावे करतात त्यापैकी कोणीही येऊन जर सिद्ध केले तर, महर्षि अध्यात्मिक प्रतिष्ठान व सर्व संत महंत आचार्य आदींच्या वतीने 51 लाखांचे बक्षीस नाशिक येथील महंत अनिकेशास्त्री देशपांडे यांनी जाहीर केले आहे.
शासनाने लागू केलेल्या या कायद्याच्या उद्देश भरकटला असल्याचा आरोप नाशिक येथील महंतांनी केला आहे. फक्त हिंदूंना आणि हिंदू धर्मगुरूंना टार्गेट केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यात सर्व धर्माना समान कायदा असावा अशीही मागणी या साधू महंतांकडून करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.