मनमाड (जि. नाशिक) : डिझेलच्या खर्चात लाखो रुपयांची बचत करून वायू प्रदूषण रोखण्याचे दिशेने रेल्वे प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वेचे पहिलेच ११ केव्ही /७५० व्होल्टच कोचिंग सबस्टेशन उभारण्यात आले आहे.
या सबस्टेशनच्या उभारणीमुळे आता डिझेलच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. तसेच यामुळे धावत्या इंजिन गाडीत विद्युत प्रवाह जाऊन संपूर्ण गाडीला विद्युतप्रवाह मिळणार आहे. (Current flowing in running engine car will give current to car Sub Station in Manmad Railway Station nashik news)
ट्रेन लायटिंग आणि एअर कंडिशनिंग चाचणी आणि देखभालीसाठी तसेच एसी कोचसाठी प्री-कुलिंग सुविधेसाठी हे केंद्र स्थापित करण्यात आले आहे. या पूर्वी पिट लाइनवर एलएचबी रेकच्या देखभाली दरम्यान पॉवर कारचा डीजी सेट आधी चालवणे आवश्यक होते. यामध्ये पॉवर कार कर्मचारी आणि मौल्यवान डिझेलचा वापर यांचा वापर करावा लागत होता.
हे सर्व डिझेलवर असल्याने रेल्वे प्रशासनाला डिझेलवर लाखो रुपये खर्च करावा लागत होता. मात्र आता रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेल्या विभागातील पहिल्या ११ के व्ही /७५० व्होल्टचे कोचिंग सबस्टेशन उपयुक्त ठरणार आहे.
भुसावळ विभागीय मंडल रेल प्रबंधक एस.एस.केडिया आणि वरिष्ठ मंडळ अभियंता जे. पालटासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागातील विद्युत सामान्य सेवा शाखेत सतत सुधारणा करण्यात येत आहेत. त्याचा हे केंद्र एक भाग असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
खर्चासह प्रदूषणातही घट
मनमाड रेल्वे स्थानक येथे तयार करण्यात आलेल्या या सबस्टेशनमुळे महसूल देखील वाचणार आहे. डिझेलच्या वापरासाठी ३९ कोटी ३२ लाख रुपयांच्या खर्चाच्या तुलनेत या केंद्रामुळे वर्षाला ८ कोटी ९४ लाख रुपये वीज बिल अपेक्षित आहे.
अशा प्रकारे प्रत्येक प्रतिवर्ष ३०.३८ लाख रुपयांची निव्वळ बचत अपेक्षित आहे. अतिरिक्त फायदा म्हणून डीजी सेट चालविल्यामुळे होणारे वायू प्रदूषण देखील कमी होईल. त्याचप्रमाणे डिझेलच्या हाताळणी शुल्कातही बचत होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.