Nashik Zika Virus : नाशिकमध्ये ‘झिका’चा धोका? इचलकरंजीत रुग्ण आढळल्यानंतर महापालिका अलर्ट मोडवर

Zika Virus
Zika Virusesakal
Updated on

Nashik Zika Virus : कोल्हापुर जिल्ह्यातील इचलकरंजी तालुक्यात झिका व्हायरसचे तीन रुग्ण आढळल्यानंतर नाशिक महापालिकेचा वैद्यकीय विभाग ‘अॅलर्ट मोड’मध्ये आला आहे.

तपासणी करताना तूर्त कुठल्याच प्रकारचा धोका नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते यांनी माहिती दिली. (currently no risk of Zika virus in Nashik news)

इचलकरंजी शहरात झिका विषाणूचे तीन रुग्ण आढळले. त्यात एका डॉक्टरांसह गर्भवती महिलेचा समावेश आहे. त्यामुळे विषाणूंचा राज्यभर प्रसार होवू नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

त्याअनुषंगाने नाशिक महापालिका हद्दीत ‘झिका’चा कुठल्याच प्रकारचा धोका नाही. झिका विषाणूंचा प्रसार डासांपासून होत असल्याने स्वच्छता हाच एकमेव उपाय आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Zika Virus
Zika Patient : पुण्यात पुन्हा झिका, दूसरा रुग्ण आढळल्यामुळे दक्षतेचे आदेश

ताप येणे, अंग ठणकणे अशा प्रकारची लक्षणे आहेत. लहान मुले व गर्भवती महिलांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, डोळ्यांची साथ नियंत्रणात आली असून डेंगीची साथ नियंत्रणात असली तरी खासगी रुग्णालयांना डेंगीच्या रुग्णांची माहिती महापालिकेकडे कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. डेंगी चाचणीसाठी सहाशे रुपये दर निश्चित करण्यात आले आहे.

Zika Virus
Zika Virus: आरोग्य विभागाकडून सतर्कतेचा इशारा; 5 वर्षाच्या चिमुकलीचे झिका रिपोर्ट्स पॉजिटिव्ह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.