Nashik Bribe Crime : केटरिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा प्रयोगशाळेतील वरिष्ठ अणुजीव सहाय्यकाला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान, या कारवाईनंतर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुण्यातील एसीबी कार्यालयास अवगत करून सहाय्यकाच्या घराची झडती घेतली असता काहीही आढळून आले नाही. (Custody of senior nuclear aide who accepted bribe nashik news)
वैभव दिगंबर सादिगले (वय ४८, रा. वक्रतुंड अपार्टमेंट, तिडके कॉलनी, नाशिक, मूळ रा. टिळेकरनगर, पुणे) असे वरिष्ठ अणुजीव सहाय्यकाचे नाव आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तो कार्यरत आहे. पाण्याच्या नमुने तपासणीचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी लाच मागून ती स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. २९) दुपारी रंगेहाथ पकडले होते.
या प्रकरणी तपास सुरू आहे. सादिगले नाशिक येथील आस्थापनेच्या कार्यालयात कार्यरत असल्याने तिडके कॉलनीत तात्पुरत्या स्वरूपात ‘कॉटबेसिस’वर खोली घेऊन राहतो.
त्यामुळे ‘एसीबी’च्या पोलिस निरीक्षक तथा तपासाधिकारी मीरा आदमाने यांनी पुणे येथील एसीबी कार्यालयाशी संपर्क करून तेथील पथकाने सादिगले याच्या घराची झडती घेतली.
मात्र, प्राथमिक तपासात घरात काही आढळून आलेले नाही. दरम्यान, सादिगले याची पत्नी न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत कार्यरत असून, नाशिक एसीबी पुणे कार्यालयाच्या संपर्कात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.