येवला (जि. नाशिक) : येवला शहर, तसेच अंदरसूल व नगरसूल कक्षात वीजबिलाचे तब्बल १३० कोटी रुपये थकले आहेत. थकबाकीचा आकडा वाढतच चालल्याने आता महावितरणतर्फे घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, कृषिपंप व दिवाबत्ती ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम हाती घेतली आहे. (Customers in Yeola have arrears of Rs 130 crore of electricity bills)
गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाउन झाला. तेव्हापासून ग्राहकांकडून वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. सुरवातीच्या टप्प्यात काही मंत्र्यांनी वीजबिलमाफीची आश्वासने दिल्याने अनेक नागरिकांनी बिलेच भरली नव्हती. त्यानंतर दुसरा लॉकडाउन झाल्याने शासन बिलमाफीचा निर्णय घेऊ शकते अशा शक्यतेने अनेकांनी वीजबिले भरण्याकडे दुर्लक्ष केले. आता शासनाकडून वसुलीचे आदेश आल्याने महावितरणही सक्रिय झाले आहे. मार्च २०२१ पासून येवला शहर, अंदरसूल व नगरसूल कक्षामध्ये वीजदेयकाचा भरणा न केलेले घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, दिवाबत्ती सुमारे १९ हजार ३१ ग्राहक व कृषिपंपाचे सुमारे १२ हजार १५४ ग्राहक असून, त्यांची थकबाकी १३० कोटी रुपये एवढी आहे. शहर मंडळात घरगुती ग्राहकांकडे एक कोटी ८६ लाख, औद्योगिक ग्राहकांकडे ९६ लाख, तर कृषी ग्राहकांकडे दोन कोटी ७७ लाख असे सहा कोटी ९७ लाख रुपये थकीत आहेत.
याउलट अंदरसूल मंडळात तब्बल ५७ कोटी तर, नगरसूल मंडळात ६५ कोटी रुपये थकले आहेत. एकूण १३० कोटींच्या थकबाकीत फक्त कृषिपंपाची तब्बल १११ कोटी रुपये थकले आहेत. दिवाबत्तीचे १२ कोटी ६६ लाख, घरगुती ग्राहकांचे ३ कोटी ६७ लाखाची थकबाकी असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता विनायक इंगळे यांनी दिली.
महावितरणतर्फे वीज ग्राहकांना वारंवार विनंती करून व नोटीस पाठवूनही ग्राहकांनी वीज देयकाचा भरणा केला नाही परिणामी महावितरणतर्फे वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. सोमवार (ता. १४) पासून जवळपास ९० लोकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
(Customers in Yeola have arrears of Rs 130 crore of electricity bills)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.