येवला : बँकेच्या खात्याचे केवायसी अपडेट करण्यासाठी पासबुक, पॅनकार्ड,एटीएम कार्ड याची माहिती घेऊन ठकबाजांनी गवंडगाव येथील नारायणगिरी महाराज आश्रमाचे गोपालनंदन गुरुरामगिरी महाराज यांना तब्बल १ लाख ४४ हजार रुपयांना चुना लावला आहे. बँक खात्याचे डिटेल घेऊन त्यांच्या खात्यातून विविध मार्गाने ही रक्कम ठकबाजांनी लंपास केली आहे.
गोपालनंदन महाराजांनी सायबर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनंतर तालुका पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता.१५) गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचे अंदरसुल येथील बँक ऑफ बडोदा शाखेत बँक खाते असुन याच खात्याला त्यांनी आँनलाईन व्यवहारासाठी यु.पी.आय. फोन पे, पेटीएमचा मोबाइल क्रमांक कार्यान्वित केलेला आहे. ४ सप्टेंबरला आश्रमात असतांना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यावरील व्यक्तीने बँक ऑफ बडोदाच्या मेन ऑफीस मुंबई येथुन बोलत असल्याचे सांगत बँक खात्याचे केवायसी अपडेट करा अन्यथा खाते कायमस्वरूपी बंद होईल असे सांगितले. खाते चालु ठेवायचे असेल तर पासबुक,आधारकार्ड, पॅनकार्ड,ए.टी.एम कार्ड अशी माहिती मागितली. बँक खाते बंद होईल या भितीने महाराजांनी त्यांना ही माहिती दिली. तब्येत बरी नसल्याने महाराज औषध घेवून आश्रमात झोपी गेले.
मात्र दुसऱ्या दिवशी त्यांच्या खात्यातुन बरेच यु.पी.आय. ऑनलाईन ट्रान्झेक्शन झाल्याचे मेसेज आलेले होते. त्यांनी अंदरसूल येथे जाऊन बँकेत घडलेला प्रकार सांगितल्यावर ऑनलाईन फसवणुक झाल्याचे त्यांना समजले.
या दोन दिवसांत त्यांच्या खात्यातुन पेटीएम, कॅश फ्रि पेयु मनी, टोरासेस अशा ऑनलाईन यु.पी.आय साईटवर वेगवेगळे ऑनलाईन ट्रान्झेशन होवुन १ लाख ४४ हजार ३९७ रुपयांचा ऑनलाईन अपहार झाला आहे. याप्रकारणी गोपाल नंदन महाराजांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक अनिल भावारी अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.