नाशिकमध्ये व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते हॅकर्सच्या टार्गेट लिस्टवर!

cyber crime
cyber crimeesakal
Updated on

नाशिक : कोरोनाच्या काळात (corona virus) अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. याच पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर भावनात्मक पोस्ट झळकू लागल्या. कोणी मदतीची याचना केली तर कोणी आधाराची...याचाच फायदा सायबर हॅकर्स (cyber hackers) सक्रीय झाले. आणि त्यांनी व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्यांनी टार्गेट करायला सुरूवात केली. यामुळे ज्यांना खरच मदतीची गरज आहे. असे लोकं वंचित राहिले. कारण कोणती पोस्ट खोटी व कोणती खरी याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. तसेच शहरासह ग्रामीण भागातील फेसबुक अकाउंट हॅक करून संबंधितांच्या मित्रांकडून पैसे उकळण्याचा प्रकार उजेडात आला असून, सर्व फेसबुकधारकांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे. अन्यथा मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (cyber-crime-hackers-activated-nashik-marathi-news)

अन्यथा मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती

देवळा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्यांच्या मित्रांकडून पैसे मागणीचा प्रकार घडला होता. त्यात अनेकांना आर्थिक फटका बसल्याने त्यांनी वेळीच खबरदारी घेऊन पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ''मी आजारी असून हॉस्पिटलमध्ये भरती झालो आहे, उपचारासाठी मला पैशांची गरज आहे, किंवा मला तातडीने पैशांची गरज असून माझ्या खात्यात त्वरित पैसे टाका, असा संदेश फेसबुक प्रोफाइल हॅक करून आपले मित्र आणि नातेवाइकांना येतो. मित्र आणि नातेवाईक त्वरीत दिलेल्या खाते क्रमांकावर पैसे टाकतात व नंतर फसवणुक झाल्याचे लक्षात येते. देवळा तालुक्यात अशा प्रकारे सायबर हॅकर्सकडून अनेकांचे फेसबुक प्रोफाईल हॅक करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या असून आतापर्यंत अनेक नागरीकांना मनस्ताप भोगावा लागला आहे. तसाच प्रकार येथील ठेकेदार व पत्रकार यांच्या बाबतीत घडला असून, त्यांचे फेसबुक अकाऊंट खाते हॅकर्सने हॅक करून त्या फेसबुक अकाउंट वरील मेसेंजरवर संदेश पाठवून अनेकांकडे पैशांची मागणी केली.

तुम्हाला तर आला नाही ना...या क्रमांकावर मॅसेज

नाशिकमध्ये अनेक लोकांना या सायबर भामट्याकडून खाते क्र. ९१८२२२२८२९७५० IFC PYTM 0१२३४५६ वर पैशाची मागणी केलेली आहे. त्यामुळे अनेक मित्रांनी पैसे पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ९६७८६०५०३४ या नंबर वरून व्हॉटस्अ‍ॅप वरूनसुद्धा पैसे मागण्यात आले आहेत. त्यामुळे त्यातील काही सुजाण नागरिकांनीि तात्काळ देवळा पोलिसात तक्रार दाखल करून संबंधित हॅकर्सचा शोध घेण्याची मागणी केली आहे.

सायबरतज्ञ म्हणतात....

हॅकर्स क्रिमिनल्स या टेक्नोलॉजीचा गैरवापर करून जनतेला गंडा घालायचा प्रयत्न करतात. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक त्रास होण्याची शक्यता असते. सायबर क्राईमला आळा बसावा यासाठी नेहमी जनजागृती ही सार्वजनिक ठिकाणी तसेच ऑनलाईन स्वरुपात केली जात असते. त्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. -तन्मय दिक्षीत, सायबरतज्ञ

cyber crime
'मार्च'मध्ये कोरोना वाढण्यामागे लग्नाची गर्दीच कारणीभूत!

देवळा तालुक्यातील घटनात वाढ : व्यापारीला गंडा

देवळा येथील व्यापारीला फेसबुक आयडी हॅक झाल्याचा अनुभव कौतिक पवार,अतुल आहेर, मुख्याध्यापक चंद्रकांत आहेर, नितिन गुंजाळ आदींना आला आहे. अतुल आहेर यांचे फेसबुक आयडी हॅक करून त्यांच्या नातेवाईक आणि अनेक मित्रांना संदेश पाठवण्यात आले. अतुल आहेर हे दवाखान्यात ॲडमीट असून त्यांना १० ते २० हजार रूपयांची मदत करा, असा उल्लेख मेसेजमध्ये करण्यात आला होता. दुदैवाने त्यांच्या नाशिक मधील एका मित्राने फारशी चौकशी न करता त्वरीत ३ हजार रूपये हॅकर्सने सांगितलेल्या अकाऊंटमध्ये फोन पेनेद्वारे टाकून दिले व नंतर अतुल आहेर यांच्या प्रकृतिची चौकशी करण्यासाठी संपर्क साधला असता फसवणुक झाल्याचे निदर्शनास आले. दुसऱ्या एका मित्राने ८ हजार रूपये अकाऊंटला टाकले. परंतु तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे त्यांचे पैसे वाचले. नंतर अतुल आहेर यांनी खुलासा केला कि ते हॉस्पीटलमध्ये दाखल नसून त्यांनी फेसबूकवरून कोणतीही मदत मागितलेली नाही. यानंतर त्यांनी एक पोस्ट करून आपल्या मित्रांना झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.यानंतर आहेर यांनी देवळा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांना संपूर्ण माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना फेसबुक आयडी लॉग आऊट करून मित्रांना माहिती देण्याचा सल्ला दिला.

cyber crime
लासलगाव बाजार समितीने घेतला 'हा' ऐतिहासिक निर्णय

विचार करूनच पैशाचा व्यवहार करा.

सध्या प्रतिष्ठीत व्यक्तींना टार्गेट करत त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक करण्याचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना फेसबुकवरुन विविध कारणे सांगून पैशाची मागणी झाल्यास त्याला कोणीही प्रतिसाद देऊ नका. संबंधित व्यक्तीला फोन करून विचारूनच पैशाचा व्यवहार करा. . - सुनील गायकवाड, व्यापारी,देवळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.