Nashik News : नाशिक जिल्हा ‘अलर्ट’ मोडवर! आक्षेपार्ह पोस्टवर सायबरची करडी नजर

Nashik News : नाशिक जिल्हा ‘अलर्ट’ मोडवर! आक्षेपार्ह पोस्टवर सायबरची करडी नजर
esakal
Updated on

Nashik News : संगमनेरमध्ये दगडफेक तर, कोल्हापुरात तणाव निर्माण झाल्याने गृह विभागाने राज्यभरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ‘अलर्ट’ जारी केला आहे.

त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि जिल्हा ‘अलर्ट’ मोडवर आहे. (Cyber ​​watch on offensive posts by police nashik news)

पोलिस आयुक्तांच्या आदेशान्वये शहरात तर पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील संवेदनशिल क्षेत्रात करडी नजर ठेवली जात आहे. तसेच सायबर मॉनिटरिंगच्या माध्यमातून सोशल मीडियावर गस्तीद्वारे लक्ष ठेवले जात असून, आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये दोन गटात दगडफेक तर कोल्हापुरात दंगलसदृश परिस्थितीमुळे गृह विभागाने राज्यभर अलर्ट जारी केले आहेत.

या घटनेचे पडसाद राज्यातील अन्य शहरांमध्येही उमटण्याची शक्यता असल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहर आणि जिल्ह्यातही पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

नाशिक आयुक्तालयाने शहर परिसरात करडी नजर ठेवण्याचे आदेश पोलिस ठाण्यांना दिले आहेत. शहरातील संमिश्र वस्ती आणि संवेदनशील ठिकाणी गोपनीय यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik News : नाशिक जिल्हा ‘अलर्ट’ मोडवर! आक्षेपार्ह पोस्टवर सायबरची करडी नजर
Nashik Bribe Case: लाचखोर सुनीता धनगर अखेर निलंबित; सतिश खरे, धनगर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

तसेच, शहर परिसरात घडणाऱ्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

सोशल मीडियावर करडी नजर

नाशिक शहर व जिल्ह्यात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहर व ग्रामीण सायबर पोलिसिंगद्वारे ‘वॉच’ ठेवला जात आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज व पोस्ट टाकणाऱ्यांची धरपकड करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसअॅप, ट्वीटर या सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारे, अवमानकारक, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, फोटो किंवा संदेश प्रसारित करू नयेत, असे केल्यास वापरकर्त्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये शहर-जिल्हा सायबर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

पोलिसांच्या सुट्ट्या, रजा रद्द

राज्यातील तणावाची परिस्थिती पाहता, नाशिक शहर व ग्रामीण पोलिस दलातील अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांच्या रजा आणि साप्ताहिक सुट्ट्या आगामी पाच दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.

Nashik News : नाशिक जिल्हा ‘अलर्ट’ मोडवर! आक्षेपार्ह पोस्टवर सायबरची करडी नजर
Majhi Vasundhara 3.0: माझी वसुंधरा अभियानात NMC नवव्या स्थानी; आरोग्यसोबतच आता उद्यान विभागदेखील ‘रडार’वर

तसेच, सुट्ट्यांवर गेलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना तत्काळ कर्तव्यावर हजर होण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत.

जिल्ह्यातही सतर्कता

या पाश्‍‍र्वभूमीवर जिल्हाभरात सतर्कता बाळगण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी दिल्या आहेत. विशेषतः: संवेदनशिल परिसरातील अधिकाऱ्यांना घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अधिकारी-अंमलदारांना गस्त वाढविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

"शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. विशेषतः सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी सायबर मॉनिटरिंगद्वारे सोशल मीडियावर लक्ष ठेवले जात आहे." - अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, नाशिक.

"जिल्हानजिक घडणाऱ्या घटनांच्या पाश्‍‍र्वभूमीवर जिल्ह्यातील संवेदनशिल भागावर विशेष बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. राखीव पोलिस दलासही सज्जतेच्या सूचना दिल्या आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेजस्‌बाबत जागरूक नागरिकांनीही सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे." - शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण.

Nashik News : नाशिक जिल्हा ‘अलर्ट’ मोडवर! आक्षेपार्ह पोस्टवर सायबरची करडी नजर
Aurangzeb Controversy : औरंगजेबाचे फोटो झळकण्याला राजकीय वास : सत्यजित तांबे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.