Nashik Dada Bhuse News : अन पालकमंत्र्यांमधील कार्यकर्ता जागा होतो तेव्हा...!

Guardian Minister Dada Bhuse while giving understanding to the drivers who park their vehicles on the side of the highway in Kalyan Phata and interacting with the officials.
Guardian Minister Dada Bhuse while giving understanding to the drivers who park their vehicles on the side of the highway in Kalyan Phata and interacting with the officials. esakal
Updated on

Nashik Dada Bhuse News : वडपे ते ठाणे या दरम्यान वारंवार वाहतूक ठप्प होत असल्याने नाशिकहून मुंबईत पोहोचण्यासाठी तब्बल चार ते पाच तास लागतात.

या पार्श्वभूमीवर नाशिककरांसह भिवंडी, कल्याण व ठाणे येथील नागरिक, उद्योग व व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना सांगितल्या मात्र त्यानंतरही ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसांकडून दाखल घेतली जात नाही. (dada bhuse cleared Traffic at Kalyan Phata nashik news)

याचा अनुभव नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना आज आला. नियोजित कार्यक्रमासाठी नाशिकहून ठाणे येथे जात असताना कल्याण फाटा येथे आज मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होते. सायरन वाजूनही वाहतूक पुढे सरकत नसल्याने पालकमंत्री भुसे स्वतः गाडीखाली उतरले. यावेळी महामार्गावर अनावश्यक उभ्या असलेल्या वाहन चालकांना त्यांनी सुनावले.

ड्युटीवर असलेल्या पोलिसांना देखील मुख्यमंत्र्यांच्या सूचनांची दखल घेण्याचे निर्देश त्यांनी दिले महामार्गावर विनाकारण वाहने थांबू नये असे आदेशित असल्याने त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

पुढील वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत आठ पदरी महामार्गाचे काम पूर्ण होईल तोपर्यंत वाहतुकीवर मार्ग काढण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे अध्यक्षतेखाली टास्क फोर्स ची निर्मिती करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Guardian Minister Dada Bhuse while giving understanding to the drivers who park their vehicles on the side of the highway in Kalyan Phata and interacting with the officials.
Dada Bhuse Latest News: आपले दुधाचे दातही पडले नाहीत, त्यामुळे...; दादा भुसेंची आदित्य ठाकरेंवर टीका

टास्क फोर्सच्या बैठकीतील सूचनेनुसार अंमलबजावणी करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. महामार्गावर उभ्या राहणाऱ्या वाहन चालकांना त्यांनी स्वतः समज दिली यावेळी. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कार्यरत असलेले वाहतूक पोलीस अधिकारी व महाराष्ट्र राष्ट्रीय विकास महामंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

"मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने महामार्गाचे काम सुरू आहे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या किरकोळ बाबींचा निपटारा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होत नसल्याची बाब निदर्शनास आल्याने स्वतः रस्त्यावर उतरून वाहन चालकांना समज दिली." - दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक.

Guardian Minister Dada Bhuse while giving understanding to the drivers who park their vehicles on the side of the highway in Kalyan Phata and interacting with the officials.
CM Eknath Shinde : खड्ड्यांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री 'ऑनफिल्ड'; अधिकऱ्यांना दिले खड्डे बुजवण्याचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.