Dada Bhuse : मर्यादा सोडू नका, नाहीतर.... पालकमंत्री दादा भुसे यांचे संजय राउतांना खडेबोल

Dada Bhuse news
Dada Bhuse newsesakal
Updated on

Dada Bhuse : सध्या राज्‍यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम काहींकडून सुरू आहे. टीका करताना मर्यादा सोडू नका, नाहीतर आम्‍हालाही मर्यादा सोडावी लागेल, अशा शब्‍दात पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (ता.१४) खडेबोल सुनावले.

शासकीय विश्रामगृह येथे झालेल्‍या पत्रकार परीषदेप्रसंगी त्यांनी ‘सामना’ तील टीकेला प्रतिउत्तर दिले. संजय राऊत मातोश्रीची भाकरी खाताना, चाकरी शरद पवार यांची करतात, अशी टीकादेखील त्‍यांनी केली. (dada bhuse comment on sanjay raut statement nashik news)

पालकमंत्री श्री. भुसे म्‍हणाले, की मुख्यमंत्र्यांच्‍या संपूर्ण कुटुंबाला पंतप्रधान भेटले. त्यांना शाबासकीची थापही दिली. गृहमंत्री अमित शहा यांच्या घरातदेखील मुख्यमंत्र्यांचे स्वागत झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नसून, दिवसातील अठरा ते वीस तास काम करत आहेत.

किमान पाच -सहा तास झोपेची आवश्‍यकता असल्‍याने आम्‍ही त्‍यांना आराम करण्याचा सल्‍ला देत असतो. दोन दिवस आरामासाठी ते शेतात गेले, तेथूनदेखील ते काम करत होते.

कांदाप्रश्‍नी शेतकऱ्यांशी चर्चा करणार

कांद्याच्‍या प्रश्‍नावर ते म्‍हणाले, की कांद्याला कमी दर मिळत असल्याने अनुदानाची घोषणा केली होती. लवकरच अनुदान शेतकऱ्यांचे खात्यात वर्ग होतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dada Bhuse news
Nashik Dada Bhuse : नाशिककरांना 8 दिवसात दिसेल रिझल्ट; पालकमंत्र्यांचे आश्वासन

कांद्याचे दर कोसळले त्‍यावेळी नाफेडमार्फत कांदा खरेदी केला होता. आता कांद्याला चांगले दर मिळत आहेत. खरेदी केलेला कांदा नाफेडने बाजारपेठेत आणू नये, अशी शेतकरी संघटनांची इच्छा असेल, तर त्‍यांच्‍यासोबत चर्चा करून उचित तोडगा काढला जाईल.

सूचना केल्‍यास काश्मीरमध्येही ध्वजवंदन

स्‍वातंत्र्यदिनी ध्वजारोहणासंदर्भातील प्रश्‍नाबाबत ते म्‍हणाले, की मी नाराज नसून, आजही बैठक घेतली. ध्वजारोहणासंदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेत असतात. उद्या मला मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर मी काश्मीरला जाऊनदेखील ध्वजारोहण करेल, असे श्री.भुसे म्‍हणाले.

Dada Bhuse news
Sanjay Raut : ''शरद पवारांमुळे आघाडीमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, म्हणून...'' संजय राऊतांची भाषाच बदलली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.