Dada Bhuse : राज्यात ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. त्याला आळा घालण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये सायबर सेल सुरु करावा, अशी मागणी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली आहे.
यासंबंधीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. (Dada Bhuse demand toCM Deputy Chief Minister Start cyber cell in every police station nashik)
श्री. भुसे म्हणाले, की सोशल मीडियासह ऑनलाइन बँकिंग, ऑनलाइन खरेदीसह विविध कर्ज योजनांद्वारे नागरिकांची फसवणूक होत आहे. त्यात ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या मोठी आहे.
सद्यःस्थितीत प्रत्येक जिल्हास्तरावर सायबर सेल कार्यान्वित आहेत. या सेलमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या विचारात घेता सायबर सेलमधील नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशा प्रमाणात नाही.
त्यामुळे फसवणूक केलेल्या गुन्हेगारांचा शोध व गुन्ह्यांच्या तपास कार्यात विलंब होतो. तपास योग्य दिशेने होत नसून आरोपी पकडले जात नाहीत. त्यामुळे गुन्हेगारांचे फोफावले असून या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये सायबर सेल सुरु करायला हवा.
राज्यात मुंबई पोलिस धर्तीवर राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये सायबर सेल कार्यान्वित करून तेथील पोलिस ठाणे अंमलदार यांचेतर्फे विशिष्ट आर्थिक मर्यादेपर्यंत गुन्ह्यांची नोंद ‘नॅशनल सायबर पोर्टलवर' केल्यास गुन्ह्यांचा तपास जलदगतीने होऊन आरोपींचा शोध लागेल.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तक्रारदारास लवकर न्याय मिळेल. तसेच जिल्हा सायबर सेलवरील येणारा अतिरिक्त ताण कमी होईल. शिवाय दिवसेंदिवस वाढता संगणक व इंटरनेटचा वापर आणि त्याअनुषंगाने सायबर गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ ही चिंताजनक बाब आहे.
या गुन्ह्यांना शहरातील तरुणांबरोबर प्रौढ व्यक्ती कळत-नकळत बळी पडत आहेत. सायबर गुन्ह्यांचे लक्ष्य होऊ नये म्हणून अधिक सतर्कता बाळगणे हाच यावर उपाय आहे. सायबर गुन्ह्यात माहितीची चोरी, ई-मेलच्या माध्यमातून अपशब्द पाठवणे, अवैध वापर, माहितीत सहेतूक फेरफार, व्हायरस हल्ला, ठरवलेली सेवा देण्यास नकार असे अनेक प्रकार आहेत.
पोर्नोग्राफी, ‘ट्रॅफिकिंग' यासारखे काही गुन्हे हे समाजाच्या आरोग्यास हानी पोहोचवत असतात. त्यामुळे भविष्यात या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याची गरज असल्याचेही श्री. भुसे यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.