Dada Bhuse : नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे यांच्यात केसरकरांचा समन्वय : दादा भुसे

Dada Bhuse news
Dada Bhuse newsesakal
Updated on

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी काही काळ समन्वयाची भूमिका केली असल्याने त्यांच्याकडे बरीच माहिती आहे, अशा शब्दात पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. (dada bhuse statement about deepak Kesarkar is coordinator between Narendra Modi Uddhav Thackeray nashik news)

श्री. भुसे शनिवारी (ता. ८) टंचाई आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की शिवसेना-भाजप युतीच्या अनुषंगाने मागील सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात समन्वयाचे काम मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे होते. खासगी बैठकीत बोलताना त्यांच्याकडे दोन्ही नेत्यांतील बरीच माहिती आहे. मी सामान्य कार्यकर्ता असल्याने त्याविषयी बोलणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Dada Bhuse news
Sharad Pawar : कामगारांचे ऐक्य हेच चळवळीच्या यशाचे सूत्र : शरद पवार

आदित्य ठाकरेंची कीव

आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्यांच्या अनुषंगाने केलेल्या टीकेला उत्तर देताना श्री. भुसे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. भुसे म्हणाले, की अयोध्येत राममंदिर आणि काश्मीरमधील ३७७ कलम रद्द करणे, हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या सरकारकडून त्यांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद म्हणून शिवसैनिक अयोध्येला जात असताना त्यांच्याविषयी आनंद बाळगण्याऐवजी गरळ ओकणे म्हणजे आदित्य ठाकरे यांची कीव करावीशी वाटते.

Dada Bhuse news
Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या संधी उध्वस्त करणे हेच सरकारचे धोरण : शरद पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.