Nashik Dada Bhuse : दवाखान्यातील गर्दी कमी करण्यासाठी रानभाज्यांची आवश्यकता : पालकमंत्री दादा भुसे

Dada Bhuse Latest Marathi News
Dada Bhuse Latest Marathi Newsesakal
Updated on

Dada Bhuse : रासायनिक खतांसह औषधांची फवारणी करून पिकवलेल्या भाजीपाल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. दवाखान्यांतील गर्दी कमी करण्यासाठी रानभाज्यांचा आहारात वापर होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यातर्फे संभाजी चौक, उंटवाडी येथे झालेल्या रानभाज्या महोत्सवात सोमवारी (ता. १४) ते बोलत होते. (dada bhuse statement about wild vegetables eating benefits nashik news)

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, ‘रामेती’चे प्राचार्य शिवाजी आमले आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते दोनदिवसीय रानभाज्या महोत्सवाचे उदघाटन झाले. रानभाज्या विक्रीत सातत्य असायला हवे. त्यासाठी जिल्हाधिकारी व कृषी कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. श्री. झिरवाळ म्हणाले, की रानभाज्यांच्या बारमाही विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

आदिवासी बांधव त्यात सातत्य ठेवतील. आदिवासी भागातील व्यक्तींचे विक्री कौशल्य विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. राजेंद्र निकम यांनी प्रास्ताविक केले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक स्वप्नील बच्छाव यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dada Bhuse Latest Marathi News
Wild Vegetable : रानभाज्यांपासून सुरगाण्याचा आयुर्वेदिक चहा; सर्दी, खोकला, ॲसिडिटी, हिवताप, डोकेदुखीवर गुणकारी

स्मार्ट अंमलबजावणी कक्षाचे विभागीय अध्यक्ष सुनील वानखेडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, शहराध्यक्ष प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते.

महोत्सवात ८० भाज्या

मंगळवार (ता. १५)पर्यंत सुरू असलेल्या रानभाज्या महोत्सवात ८० प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यात ४५ पालेभाज्या, २० फळभाजी, नऊ वेलवर्गीय व सहा कांदा प्रकार उपलब्ध आहेत. याशिवाय आयुर्वेदिक चहा आणि खाद्यपदार्थही उपलब्ध आहेत.

चार तास उशीर

पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दुपारी दोनला या महोत्सवाचे उदघाटन करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले होते. त्यानुसार शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी याठिकाणी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. भुसे थेट सायंकाळी सहाला आल्याने तोपर्यंत शेतकऱ्यांनी काढता पाय घेतल्याचे दिसून आले.

Dada Bhuse Latest Marathi News
Dada Bhuse : मर्यादा सोडू नका, नाहीतर.... पालकमंत्री दादा भुसे यांचे संजय राउतांना खडेबोल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.