Dada Bhuse: भजनी मंडळांना सरकारतर्फे मिळणार साहित्य; पालकमंत्री भुसे

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त गजर हरिनामाचा भजन स्पर्धा
Bhajan Competition
Bhajan Competitionesakal
Updated on

Dada Bhuse : मोबाईल आणि व्यसनाच्या आहारी जात असलेल्या तरुणांना यापासून परावृत्त करत भक्तीच्या मार्गावर आणणाऱ्या भजनी मंडळांना राज्य सरकारतर्फे मोफत भजन साहित्य पुरवले जाणार असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी केली. (Dada Bhuse statement Bhajani Mandals will receive materials from government nashik)

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त नाशिक शिवसेना महानगरातर्फे रविवारी (ता. २३) ‘गजर हरिनामाचा’ ही भजन महोत्सव स्पर्धा घेण्यात आली. मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात दिवसभरात जिल्ह्यातील ५१ मंडळांनी भजने सादर केले.

कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभात पालकमंत्री भुसे बोलत होते. ते म्हणाले, समर्पित भावनेने कुठलेही कार्य केले तर देव आपल्याला निश्चितपणे आशीर्वाद देतो. वारकरी संप्रदाय हा याच भावनेने काम करतो.

त्यांना सरकारतर्फे मोफत भजन साहित्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भजन महोत्सवसारखे कार्यक्रम यापुढे प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्याची घोषणाही त्यांनी केली. पालकमंत्र्यांच्या हस्ते भजन महोत्सवात सहभागी ५१ मंडळांना सन्मानपत्र व टाळ भेट देवून गौरविण्यात आले.

या वेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, मंगला भास्कर, योगेश बेलदार, रूपेश पालकर, दिगंबर नाडे, योगेश म्हस्के यांसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bhajan Competition
Nashik News: एनडीएसटीतर्फे कर्जमर्यादा आता 25 लाख! 6 टक्के लाभांश देणार

पुरुषांमध्ये कपालेश्वर, महिलांमध्ये मराठा हायस्कूलचा डंका

-शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी आयोजित केलेल्या भजन महोत्सवात महिला व पुरुष अशी स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आली. ५१ भजनी मंडळातील सदस्यांपैकी ५७० महिला, तर २९५ पुरुष सदस्य सहभागी झाले.

यात पुरुष गटात नाशिकच्या कपालेश्वर भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. तर विठ्ठल भजनी मंडळ (मालेगाव) व हनुमान ट्रस्ट भजनी मंडळ (अंबड) यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांकाचे बक्षिस मिळवले.

पुरुष गटात आत्मा मलिक आत्मसेवा भजनी मंडळाला तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. महिला व बालकांच्या गटात मविप्र शिक्षण संस्थेच्या मराठा हायस्कूल भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.

तर राधाकृष्ण भजनी मंडळ (खुटवडनगर) यांना द्वितीय तर, महालक्ष्मी महिला भजनी मंडळ व संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्थेला संयुक्तपणे तृतीय पारितोषिक देवून गौरविण्यात आले. पं. व्यंकटेश ढवण, प्रा. आनंद अत्रे, अपर्णा देशपांडे, सागर कुलकर्णी यांनी परीक्षण केले.

Bhajan Competition
Medical Admission: वैद्यकीयच्या प्रवेशासाठी नोंदणी आजपासून; सविस्‍तर वेळापत्रकाची प्रतीक्षा कायम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.