मालेगाव : जिल्हा पातळीवर मिळणारे अत्याधुनिक शिक्षण व सोयी सुविधा प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी गावातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचा चेहरा-मोहरा बदलणार आहे.
शाळांचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. (Dada Bhuse statement Committed to holistic development of schools nashik)
येथील पंचायत समितीत जिल्हा परिषदेने मंजूर केलेल्या कामांचे कार्यारंभ आदेश वाटप श्री. भुसे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, गटविकास अधिकारी भरत वेंदे, गट शिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे, सहायक गटविकास अधिकारी भास्कर जाधव, कृषी अधिकारी डी. सी. शिंदे, बी. आर. पाटील यांच्यासह विविध गावाचे सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक उपस्थित होते.
श्री. भुसे म्हणाले की, क्रिडा विभागामार्फत मंजूर केलेल्या व्यायाम शाळांचे बांधकाम, विविध खेळांची क्रीडांगणे तयार करणे, क्रीडांगणास तारेचे कुंपण तयार करणे, क्रीडांगण सम पातळीत करणे, इनडोअर व खुले व्यायाम साहित्य खरेदी करणे अशा विविध ४६ कामांसाठी २ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे.
या कामांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा आवारात क्रीडांगण व उपलब्ध होणाऱ्या सोयी सुविधांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे.
प्रत्येक काम दर्जात्मक, गुणवत्तापूर्ण व श्वासत असावे. त्याचबरोबर लोकसहभागातून क्रिडांगणाच्या भोवती वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. होतकरु, गरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे.
यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्ग खोल्या नवीन बांधण्यात येत आहेत. यावर्षी नाशिक जिल्हा परिषदेच्या १२८ शाळा आदर्श शाळा म्हणून निर्माण केल्या जाणार असून त्याअनुषंगाने शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या गावांमध्ये होणार कामे
मालेगाव तालुक्यातील दाभाडी, अस्ताणे, करंजगव्हाण, आघार खुर्द, कजवाडे, कोठरे खुर्द, गुगळवाड, चंदनपुरी, निळगव्हाण, चिखलआहोळ, जळगाव (गाळणे), झोडगे, डोंगराळे, तळवाडे, दुंधे, पाटणे, पिंपळगाव, बेळगाव, माणके, राजमाने, लखानी, लेंडाणे, वजीरखेडे, वडेल, वळवाडी, शेरुळ, सवंदगाव, साजगव्हाळ, सातमाने, सिताणे आदी गावांमध्ये क्रीडा विभागातंर्गत मंजूर झालेल्या निधीतून कामे होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.