Dada Bhuse : अवकाळी पाऊस, गारपिटीने झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचे काम पन्नास टक्के पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसांमध्ये उर्वरित पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी आज दिले. तसेच द्राक्षबागांचे नुकसान टाळण्यासाठी आच्छादनाकरिता सरकारतर्फे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. (Dada Bhuse statement Complete panchnama of weather damage in two days nashik news)
साकोरे मिग (ता. निफाड), कुर्णोली, मोहाडी, खडक सुकेणे, चिंचखेड, जोपूळ (ता. दिंडोरी) येथील द्राक्षबागा आणि पिकांच्या नुकसानीची पाहणी श्री. भुसे यांनी केली. त्या वेळी ते बोलत होते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, तहसीलदार पंकज पवार, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, माजी आमदार अनिल कदम, धनराज महाले, महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले आदी उपस्थित होते.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
दरम्यान, शेतकरी सुनील कळमकर यांच्या शेतात आच्छादनामुळे गारपिटीमुळे द्राक्षांचे फारसे नुकसान झाले नसल्याचे श्री. भुसे यांनी पाहिले. त्या वेळी द्राक्षबागांच्या आच्छादनासाठी सरकारच्या मदतीचा मुद्दा चर्चेत आला होता.
"आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर पीककर्जाची नोंद आहे अशा शेतकऱ्यांकडून जिल्हा बँकेने पीककर्ज सक्तीने वसूल करू नयेत." - दादा भुसे, पालकमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.