Dada Bhuse : शासन आपल्या दारी हा उपक्रम सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय विभागाच्या योजनांची माहिती व लाभ स्थानिक पातळीवर मिळावा यासाठी आहे. महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय यंत्रणा एकाच छताखाली आल्याने शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळणे सुलभ होणार आहे.
नागरिकांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. (Dada Bhuse statement Easy to get benefits of scheme from initiative nashik news)
सौंदाणे (ता. मालेगाव) येथे गुरुवारी (ता.१८) महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी शिबिराचा शुभारंभ श्री. भुसे यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार नितीनकुमार देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे,
पुरवठा निरीक्षक अधिकारी पी.एस.काथेपूरी, वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अंकिता वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीलेश सोनवणे,
भूमिलेख अधिकारी राहूल पाटील, सौंदाणे सरपंच शीतल पवार, उपसरपंच युवराज खैरनार, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. भुसे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करून महाशिबीरास प्रारंभ झाला. श्री. भुसे म्हणाले की, नागरिकांना शासन योजनेच्या लाभासाठी विविध कार्यालयात जावे लागते.
त्याअनुषंगाने आज विविध शासकीय योजनांशी संबंधित कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली आले. नागरिकांना विविध योजनांचे लाभ जागेवरच आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून मिळणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना, शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पीक विमा, लेक लाडकी योजना, महिलांना एसटीच्या तिकीट भाडे शुल्कात सरसकट ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना, माझी कन्या भाग्यश्री अशा विविध योजनांची माहिती श्री. भुसे यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी शेतकऱ्यांनी तलावातून गाळ काढण्याचे नियोजन करावे. गाळ काढल्यास साठवण क्षमता, गाळामुळे शेतजमिनीची सुपीकता वाढेल. गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या मशिनसाठी डिझेलचा खर्च शासन देणार आहे.
यासाठी शेतकऱ्यांना तहसील व प्रांत कार्यालय सहकार्य करेल. श्री. शर्मा यांनी प्रास्ताविक केले. संजय पवार यांनी सूत्रसंचालन केले. श्री. देवरे यांनी आभार मानले.
महाराजस्व अभियान फलित
- शिधापत्रिका-२३६
- संजय गांधी योजनेचे आदेश १३१
- सेतू प्रमाणपत्र वाटप लाभार्थी - २४५
- ट्रॅक्टर, कृषी अवजारे वाटप
- आरोग्य तपासणी,
- भूमी अभिलेख मार्फत नोंदी प्रमाणपत्र
- गोल्डन कार्ड- १००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.