Dada Bhuse News: देशातील अमृतवाटिकेत प्रत्येक गावाचे प्रतिबिंब दिसेल : पालकमंत्री दादा भुसे

Guardian Minister Dada Bhuse present while giving the amritkalash brought from each taluka to the representatives of Nehru Centre.
Guardian Minister Dada Bhuse present while giving the amritkalash brought from each taluka to the representatives of Nehru Centre.esakal
Updated on

Dada Bhuse News : देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक जण आपल्या प्राणांची आहुती देऊन शहीद झाले. त्यांच्या स्मृती, पराक्रम येणाऱ्या पिढ्यांसाठी कायमस्वरूपी मार्गदर्शक ठरावा, यासाठी दिल्ली येथे अमृतवाटिकेची निर्मिती करण्यात येणार आहे.

या अमृतवाटिकेत देशातील प्रत्येक गावातून अमृतकलशांच्या माध्यमातून माती नेण्यात येणार असल्याने या वाटिकेत देशातील प्रत्येक गावाचे प्रतिबिंब दिसेल, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. (Dada Bhuse statement Every village will be reflected in Amritwatika of country nashik)

महाकवी कालिदास कलामंदिरात शनिवारी (ता. २१) स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सांगता सोहळ्यात ‘माझी माती-माझा देश’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या अमृतकलश यात्रा कार्यक्रमात पालकमंत्री भुसे बोलत होते.

या वेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ यांच्यासह सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, सरपंच आदी उपस्थित होते.

सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या मनात देशाप्रती असणारा स्वाभिमान हा प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे. देशाप्रती असलेल्या स्वाभिमानातूनच सर्वांच्या सहभागाने सुराज्य निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे मंत्री भुजबळ यांनी या वेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथे साकारल्या जाणाऱ्या अमृतवाटिकेत सर्व देशवासीयांचा सहभाग असावा, या भावनेतून ‘माझी माती- माझा देश’ हे अभियान संपूर्ण देशात राबविले जात आहे.

कलशांमध्ये असलेली ही फक्त माती नसून, स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांची गाथा सांगणारा इतिहास या मातीत आहे. त्यामुळे संपूर्ण देशपातळीवर सुरू असणारी ही अमृतकलश यात्रा म्हणजे तेज, त्याग, तप, तत्त्व व तर्क यांचे प्रतीक असल्याचे मंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीस अमृतकलश यात्रेत उत्कृष्ट काम करणाऱ्या सुरगाणा, कळवण व नाशिक तालुक्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आणलेल्या अमृतकलशांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व कलशांची महाकवी कालिदास कलामंदिरापासून जिल्हा परिषदेपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. आशिमा मित्तल यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र परदेशी यांनी आभार मानले.

Guardian Minister Dada Bhuse present while giving the amritkalash brought from each taluka to the representatives of Nehru Centre.
SAKAL Exclusive: ‘मुक्‍त’मध्ये 4 लाख 60 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश

शोभायात्रेने वेधले लक्ष

महाकवी कालिदास कलामंदिरातील कार्यक्रम संपल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व कलशांची शोभायात्रा काढण्यात आली.

सुरगाणा, पेठ येथील पथकाने आदिवासींच्या पारंपरिक कला, नृत्य सादर करीत तसेच लेझीमपथकाने शोभायात्रेचे लक्ष वेधून घेतले. डॉ. पवार यांनी स्वतः कलश हाती घेत यात्रेत सहभाग घेतला.

कार्यक्रम नियोजनात ढिसाळपणा

कार्यक्रम नियोजनात ढिसाळपणा दिसून आला. कार्यक्रम संपल्यावर शोभायात्रा निघणार होती; परंतु यात्रेतील पथके वेळेत सहभागी झाली नाहीत. त्यामुळे उपस्थित सर्व मान्यवरांना थांबून राहावे लागले.

कार्यक्रमाबद्दल खुद्द पालकमंत्री भुसे यांनीही जिल्ह्यापेक्षा तालुकास्तरावरील कार्यक्रम चांगला झाल्याचे भाषणात बोलून दाखविले. या नियोजनावरून संतप्त झालेल्या मित्तल यांनी संबंधित अधिकारी गौरव सांगळे यांना चांगलेच खडेबोल सुनावले.

Guardian Minister Dada Bhuse present while giving the amritkalash brought from each taluka to the representatives of Nehru Centre.
Nashik News: आदिवासी लोकसंख्या गावासाठी ग्रामस्तरीय अभिसरणाची समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.