Dada Bhuse : प्रत्येकाने कर भरत देशाच्या अर्थव्यवस्थेला द्यावी गती : दादा भुसे

Guardian Minister Dada Bhuse releasing the book at the tax conference held at Hotel Express Inn.
Guardian Minister Dada Bhuse releasing the book at the tax conference held at Hotel Express Inn.esakal
Updated on

Dada Bhuse : प्रत्येकाने कर भरून देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणे हे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. हॉटेल एक्स्प्रेस इन मध्ये नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, मुंबईच्या दि गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, पुण्याच्या महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे झालेल्या कर परिषदेत श्री. भुसे बोलत होते. (Dada Bhuse statement Everyone should give speed to the country economy by paying taxes nashik news)

नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे प्रकाश विसपुते, अध्यक्ष नितीन डोंगरे, सचिव सतीश कजवाडकर, मुंबईच्या असोसिएशनचे अध्यक्ष ॲड सुनील खुशलानी, पुण्याच्या असोसिएशनचे अध्यक्ष श्रीपाद बेदरकर, नाशिक टॅक्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय सोनवणे, आर्थिक सल्लागार सुनील देशमुख आदी उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले, की जिल्ह्यातील ग्रामीण भागात करविषयक कामकाज करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. त्यांना एकत्र आणून संघटन करत जीएसटी आणि प्राप्तीकर कायद्यासंबंधी माहिती देणे,

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Guardian Minister Dada Bhuse releasing the book at the tax conference held at Hotel Express Inn.
Cricket Summer Camp : छोरीयां छोरों से कम हैं के! उन्हाळी क्रिकेट शिबीरांत मुलांच्या बरोबरीने सराव

कायद्यातील बदल-तरतुदींची, सरकारी अधिसूचनांची त्यांना माहिती देणे आणि सोप्या पद्धतीची कर प्रणाली यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकांना फायदा होत आहे.

मालेगावमध्ये घ्यावा कार्यक्रम

कर परिषद मेट्रो शहरांमध्ये व्हायची. आता नाशिकमध्ये होत आहे. त्याचा अभिमान वाटतो. भविष्यात असा कार्यक्रम मालेगावमध्ये घ्यावा, जेणेकरून ग्रामीण भागाला त्याचा फायदा होईल, असे सांगून श्री. भुसे म्हणाले, की राज्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी ज्या काही सूचना असतील त्यांचा नक्की विचार केला जाईल. आपल्या शिष्टमंडळाची भेट मुख्यमंत्र्यांसमवेत घडवली जाईल.

Guardian Minister Dada Bhuse releasing the book at the tax conference held at Hotel Express Inn.
Nashik News : गणेशवाडी उद्यानाची मरणासन्न आवस्था! गवत वाढले, ॲंगल चोरीला अन्‌ स्वच्छतेचाही अभाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.