Dada Bhuse News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडूनच पालकमंत्रिपदाचा अंतिम निर्णय : दादा भुसे

Dada Bhuse news
Dada Bhuse news
Updated on

Dada Bhuse News : पालकमंत्रिपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे अनुपालन करण्याची जबाबदारी आमची असल्याचे स्पष्टीकरण देताना दादा भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदासंदर्भात कुठलाही वाद नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे मी मार्गदर्शन घेत असल्याची पुस्तीही त्यांनी पालकमंत्रिपदाच्या वादासंदर्भात जोडली. (Dada Bhuse statement final decision of guardian minister post is from cm Deputy cm nashik news)

बुधवारी (ता. ४) राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली. नाशिकच्या पालकमंत्रिपदी सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांना कायम ठेवण्यात आले. नाशिकच्या पालकमंत्रिपदी भारतीय जनता पक्षाकडून ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ इच्छुक होते. भुजबळ व महाजन दोघांनाही पालकमंत्रिपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

त्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर आलेले पालकमंत्री भुसे यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. त्या वेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे वक्तव्य केले. त्या संदर्भात बोलताना भुसे म्हणाले, की मुख्यमंत्री शिंदे हेच राज्यातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन ते चांगले व गतीने निर्णय घेतात.

गतिमान सरकार म्हणून त्यांची ख्याती पसरली आहे. त्यांच्या निर्णयामुळे राज्यातील जनतेला मोठा आर्थिक लाभ होतो. महिला सन्मान धोरणाची अंमलबजावणी त्यांनी राज्यात केली.

Dada Bhuse news
Ajit Pawar: पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर अजितदादा पुन्हा ॲक्टिव्ह! कृषिमंत्री धनंजय मुंडेंसोबत महत्वाची बैठक

भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी प्रत्येक पक्षाला निवडणूक तयारी करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. राज्यात महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला.

डीजेवर बंदी हवी

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे व लेझरचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने नेत्रविकारतज्ज्ञांनी दुष्परिणाम होणार असल्याचे सांगितले. त्यावर बोलताना भुसे यांनी डीजे व लेझरमुळे मानव जातीला अपाय होणार असेल, तर सर्वच राजकीय पक्षांसह संघटनांनी मिळून डीजेवर बंदी घालायला हवी, असे मत मांडले.

औषधांचा साठा मुबलक

नांदेड येथील दुर्घटनेनंतर महापालिका व जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसंदर्भात माहिती घेतली. कुठेही दुःखद घटना घडली नसल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील रुग्णालयांत पुरेसा औषध साठा आहे. औषधांच्या निधीसंदर्भातही टंचाई नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली असून, अडचण येणार नसल्याचा दावा त्यांनी केला.

Dada Bhuse news
Dada Bhuse News: शिक्षणाचा मालेगाव पॅटर्न पुढे आणू या; पालकमंत्र्यांचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.