Dada Bhuse : शहरात हाट बाजार संकल्पना राबविणार : पालकमंत्री भुसे

Guardian Minister Dada Bhuse speaking in a gathering of Shiv Sena officials and workers.
Guardian Minister Dada Bhuse speaking in a gathering of Shiv Sena officials and workers.esakal
Updated on

Dada Bhuse : ग्रामीण भागाच्या धर्तीवर महापालिका हद्दीतदेखील महिलांच्या बचत गटांमार्फत तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी हाट बाजार संकल्पना राबविली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. (Dada Bhuse statement Haat bazaar concept will implemented in city nashik news)

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक मायको सर्कल येथे शिवसेना कार्यालयात झाली.

या वेळी पालकमंत्री भुसे उपस्थित होते. सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, उपजिल्हाप्रमुख श्याम साबळे, सुदाम ढेमसे, दिगंबर मोगरे, शिवाजी भोर, शशिकांत कोठुळे, प्रमोद लासुरे, अमोल सूर्यवंशी आदी या वेळी उपस्थित होते.

या बैठकीत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना तसेच शेतकरी हिताच्या योजना लोकांपर्यंत कशा पोचवायच्या या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयाचे पीकविमा संरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

शेतकऱ्यांना सहा हजार रुपये सामग्री अनुदान देण्याचीदेखील घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बिकट परिस्थितीत दिलासा मिळणार असल्याचे दादा भुसे या वेळी म्हणाले. शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसह छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायासाठीदेखील सरकार विविध व्यक्ती संस्थांच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करून मदत करत आहे.

याचा लाभ सुशिक्षित बेरोजगार व महिला बचतगटांसह अल्पउत्पन्न गटातील नागरिकांना होत आहे. महिला बचतगटांसाठी त्यांच्या हक्काचे हाट बाजार ही संकल्पनादेखील नाशिक महापालिकेच्या हद्दीमध्ये राबविली जाणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Guardian Minister Dada Bhuse speaking in a gathering of Shiv Sena officials and workers.
Adivasi Krida Prabodhini : क्रीडा प्रबोधिनीत 7 नव्या खेळांचा समावेश; आदिवासी खेळाडूंना सुवर्णसंधी!

महिला बचत गटांना त्यांची उत्पादने, खाद्यपदार्थ विक्रीसाठी हक्काचे ठिकाण या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. हाट बाजार संकल्पना राबविण्यासाठी महापालिका हद्दीत लवकरात लवकर जागा मिळवण्यासाठी महापालिका आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे या वेळी पालकमंत्री भुसे म्हणाले.

विभागनिहाय शिवदूत- बोरस्ते

राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिका क्षेत्रामध्ये शिवदूतांची नियुक्ती केली जाणार आहे. या शिवदूतांच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोचविल्या जातील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी शिवदूतांच्या खांद्यावर राहणार आहे. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी केले.

Guardian Minister Dada Bhuse speaking in a gathering of Shiv Sena officials and workers.
2000 Rupees Note: 2 हजारांच्या नोटा घेण्यास खळखळ; नोटा स्वीकारण्याची जोखीम नकोच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.