नाशिक : जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नाबाबत पूर्वकल्पना देत पालकमंत्री दादा भुसे यांनी पुढील १० दिवसांत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी दरम्यान फेरआढावा घेण्याचे निर्देश दिले. कांदा खरेदी, लंपीसह नाशिकच्या विकास योजनांचा आढावा घेतला.
श्री. भुसे यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह प्रलंबित विषयाचा आढावा घेतला. त्यात नाफेडची कांदा खरेदी, सरकारी जागेवरील अतिक्रमण धारकांची निवासव्यवस्था, वैद्यकीय महाविद्यालय, कार्गो विमानसेवा, जलसंपदाकडील प्रलंबित वळण बंधाऱ्याचा प्रश्न, पीक विमा, नाशिक पुणे -सूरत चेन्नई महामार्गाचे कामकाज, हुतात्मा स्मारक विकास यासह विविध विषयांचा आढावा घेतला. (Dada Bhuse Statement in DPDC Meeting Review of development works in 10 days Nashik Latest Marathi News)
दहा दिवसांत फेरआढावा
जिल्ह्यातील सरकारी जागेवरील अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी घरे देण्याचा विषयाचा आढावा घेतला. त्यात, संथ कामकाजामुळे प्रलंबित कामे वेळेत करण्याच्या सूचना दिल्या. पुढील महिन्यात १० ऑक्टोबरला बैठक जिल्हा नियोजन बैठकीत माहिती सादर करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील १३ तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जनावरांचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या जागांवरील अतिक्रमण रोखण्यासह मुलांच्या सुरक्षेसाठी इमारतींना कुंपण उभारण्याला प्राधान्य दिले जावे. पावसामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी विशेष निधीसाठी प्रस्ताव पाठवावा. पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी निधी आदी विषयावर चर्चा झाली.
रिंगरोडसाठी भूसंपादन
शहरात सिंहस्थापुर्वी राज्य मार्ग ३७ साठी रिंग रोड उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी ३० मीटर रस्त्याचा रिंगरोडसाठी भूसंपादन करण्यासाठी टीडीआर देऊन भूसंपादन केले जावे. अशा सूचना दिल्या. त्यावर महापालिका आयुक्तांनी आधी सविस्तर प्रकल्प अहवाल करण्याच्या सूचना उप सचिवांनी दिल्याने आधी डीपीआर तयार केला जाईल.
पालकमंत्र्यांच्या सूचना
नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी नियोजन करावे
पंचनामे नियम, निकष बदलानुसार प्रस्ताव द्यावे
घरकुल लाभार्थ्यांसाठी प्रसंगी ऑफलाइन काम
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.