Dada Bhuse : वाहतूक, रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करा : दादा भुसे

देशातील रस्ता अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. रस्ता सुरक्षा ही केवळ सरकारी यंत्रणांची जबाबदारी नसून ती सर्व नागरिकांची सामुहिक जबाबदारी आहे.
Guardian Minister Dada Bhuse while unveiling the books, brochures of road safety campaign here. Neighbor Sub Regional Transport Officer Vinod Jadhav.
Guardian Minister Dada Bhuse while unveiling the books, brochures of road safety campaign here. Neighbor Sub Regional Transport Officer Vinod Jadhav.esakal
Updated on

Dada Bhuse : देशातील रस्ता अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. रस्ता सुरक्षा ही केवळ सरकारी यंत्रणांची जबाबदारी नसून ती सर्व नागरिकांची सामुहिक जबाबदारी आहे. वाहन चालक व नागरिकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून वाहतूक व रस्ता सुरक्षा नियमाचे पालन करावे.

नियमाचे पालन केल्यास अपघात कमी होण्यास मदत होईल असे मत पालकमंत्री दादा भुसे यांनी येथे व्यक्त केले. (Dada Bhuse statement of Follow traffic road safety rules nashik news )

येथील मोसमपूल चौकात प्रादेशिक परिवहन कार्यालय व मातोश्री चालक मालक संघटनेतर्फे चालकांची नेत्र तपासणी, चित्ररथाचे उद्घाटन श्री. भुसे यांच्या हस्ते झाले. त्यावेळो ते बोलत होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव, मोटार वाहन निरीक्षक सचिन बोधले, ललित देसले, हेमंत देशमुख.

भारत भवाळ, मातोश्री चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, सुनिल चांगरे, देवा माळी आदी यावेळी व्यासपीठावर होते. श्री. भुसे व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत रस्ते सुरक्षा अभियान पुस्तके व माहिती पत्रकांचे अनावरण करण्यात आले.

Guardian Minister Dada Bhuse while unveiling the books, brochures of road safety campaign here. Neighbor Sub Regional Transport Officer Vinod Jadhav.
Dada Bhuse: शेतकऱ्यांना बसणार आश्चर्याचा धक्का ! मुख्यमंत्री 'या' दिवशी करणार मदत जाहीर, दादा भुसेंनी दिली माहिती

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्फे पाच महिन्यात अडीच हजार वाहनचालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यात दृष्टीदोष असलेल्या सातशे पन्नास वाहनचालकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले.

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सर्वांच्या मदतीने उपाययोजना केल्याने गतवर्षीच्या तुलनेत अपघातांचे प्रमाण कमी झाले. कसमादे परिसरातील सर्व गावात चित्ररथ फिरून रस्ते सुरक्षा या विषयावर प्रबोधनपर माहिती व चलचित्र दाखविले जाणार असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. मोटार वाहन निरीक्षक सचिन बोधले यांनी सुत्रसंचालन केले. हेमंत देशमुख यांनी आभार मानले.

Guardian Minister Dada Bhuse while unveiling the books, brochures of road safety campaign here. Neighbor Sub Regional Transport Officer Vinod Jadhav.
Dada Bhuse : ...तर सर्वोच्च न्यायालयावर शंका उपस्थित करणार का? दादा भुसेंचा उद्धव ठाकरेंना टोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.