मालेगाव तालुक्याच्या विकासासाठी निर्णय, आम्ही शिवसैनिकच : दादा भुसे

dada bhuse
dada bhuseesakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे आमचे दैवतच आहे. शिवसेनेने (Shiv sena) मला भरभरून खूप काही दिले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या माध्यमातून माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्याशी मैत्री व सलोख्याचे संबंध आहेत. आम्ही आजही शिवसैनिकच आहोत, यापुढेही राहू. कार्यकर्त्यांच्या स्वत: भेटीगाठी घेऊन त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगू. आम्ही अखेरपर्यंत सलोख्याचे प्रयत्न करीत होतो. अपघाताने काही घटना घडत गेल्या. त्यातून मालेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी हा निर्णय घेतला असे मत माजीमंत्री दादा भुसे यांनी आज येथे व्यक्त केले. (Dada Bhuse Statement over malegaon Development maharashtra politics News)

सटाणा रस्त्यावरील बालाजी लॉन्समधील बंदिस्त सभागृहात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बाेलत होते. बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र जाधव, माजी उपसभापती सुनील देवरे, माजी उपमहापौर सखाराम घोडके, भिकन शेळके आदी व्यासपीठावर होते. या बैठकीत पत्रकारांना प्रवेश नव्हता. कार्यकर्त्यांनी स्वत:हून मोबाईलही बंद ठेवले होते. श्री. भुसे म्हणाले, शिवसेना आमच्या रक्तात आहे. काही घटना, घडामोडी झाल्या. सर्व काही सुरळीत होईल अशी आशा होती. आम्हाला कुठलेही प्रलोभन नव्हते. तालुक्यातील बहुमोल अशी अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. ती मार्गी लागण्यासाठी व मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत असलेल्या मैत्रीतूनच शहर व तालुकावासियांसाठी हा निर्णय घेतला.

अतिशय द्विधा मनस्थिती होती. राज्यात मोठे नाव असलेले अनेक नेते या उठावात सहभागी झाले. या काळात सुनील देवरे व युवासेनेचे विनोद वाघ यांनी आपले मनोबल वाढविले असे सांगतानाच श्री. भुसे यांनी कार्यकर्त्यांना घटनाक्रम सांगितला. आगामी काळात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेवू. त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगू. तुर्त थांबा, वाट पहा, लवकरच सर्व सुरळीत होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

मेळाव्यास महिला आघाडीच्या संगीता चव्हाण, छाया शेवाळे, तालुकाप्रमुख मनाेहर बच्छाव, माजी उपमहापौर निलेश आहेर, विनोद वाघ, सुरेश पवार, शशिकांत निकम, राजेंद्र पवार, भरत देवरे, डॉ. जतीन कापडणीस, प्रमोद निकम, निळकंठ निकम, कृष्णा ठाकरे, सुनील पवार, भरत पवार, मनु देशमुख, भगवान मालपुरे, यशपाल बागुल, दीपक देसले, अनिल बच्छाव, जयप्रकाश बच्छाव, नरेंद्र सोनवणे, जयराज बच्छाव, अनिल निकम, महादू सोनवणे, अभिजित पगार, संजय निकम, रवींद्र पवार, युवराज कदम, विनोद जाधव, केवळ जाधव, रमेश पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

dada bhuse
नाशिक : पावसामुळे तहानलेल्या गावांची संख्या निम्म्यावर

अखेरपर्यंत सलोख्याचे प्रयत्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह असंख्य मातब्बर सुरत येथे गेल्यानंतर आम्ही मोजके १८ ते २० आमदार होतो. मी स्वत: उध्दव ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो. तेथे बहुसंख्य आमदार उपस्थित होते. असे काही व्हायला नको होते. असा सर्वच जण प्रयत्न करीत होते. आम्ही काही जणांनी अखेरपर्यंत सलोख्यासाठी प्रयत्न केले. ते यशस्वी झाले नाहीत. पंधरा दिवसानंतर तुमच्याशी पुन्हा हितगुज करेन. सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा आहे.

dada bhuse
नाशिक : अज्ञात टोळक्याने केली युवकाची गळा चिरून हत्त्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.