Dada Bhuse: राज्य सरकार महिलांना लवकरच देणार खूशखबर... : दादा भुसे

Guardian Minister Dada Bhuse inaugurating the Renuka Agricultural Exhibition. Neighbor MLA Dr. Rahul Aher, Dr. Atmaram Kumbharde, Kailas Bhosale, Vikas Bhujade etc.
Guardian Minister Dada Bhuse inaugurating the Renuka Agricultural Exhibition. Neighbor MLA Dr. Rahul Aher, Dr. Atmaram Kumbharde, Kailas Bhosale, Vikas Bhujade etc.
Updated on

Dada Bhuse: शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यासाठी कृषी प्रदर्शनाचा मोठा लाभ होणार आहे. कृषी विभागाच्या योजनात महिलांना प्राधान्य दिले जाते, त्यासाठी महिलांचे सातबारावर नाव लावून घ्या. राज्यातील महिलांना सरकार लवकरच खूशखबर देणार आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी येथील रेणुका कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

चांदवड येथील डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी आयोजित केलेल्या या प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल आहेर होते. (Dada Bhuse statement state government will give good news to women soon nashik news)

श्री. भुसे म्हणाले, कृषी क्षेत्रातील नवीन नवीन संशोधनाचा अनुभव या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार आहे. गारपिटीने कांदा, टोमॅटोबरोबरच द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांना कमी दरात प्लास्टिक आच्छादन मिळण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या मालाला गावपातळीपासून राज्य पातळीवरील विक्रीसाठी व्यवस्था निर्माण केली जाईल. नाशिक शहरात शंभर स्टॉल उपलब्ध करून दिले जातील. पीकविम्याची पंचवीस टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येईल.

डॉ. कुंभार्डे यांनी जिल्हास्तरावरील कृषी प्रदर्शन चांदवड येथे भरविण्यात आल्यामुळे महिलांना प्रदर्शनात सहभागी होता आले. शेतीला पूरक व्यवसाय निर्माण होण्यासाठीचा हा उत्सव याठिकाणी सुरू आहे. इथे शेतीच्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळेल.

Guardian Minister Dada Bhuse inaugurating the Renuka Agricultural Exhibition. Neighbor MLA Dr. Rahul Aher, Dr. Atmaram Kumbharde, Kailas Bhosale, Vikas Bhujade etc.
Jayant Patil News: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या; राष्ट्रवादीने फुंकले दिंडोरीतून रणशिंग

महिला बचत गटांचे पस्तीस स्टॉल लावण्यात आले आहेत, यामुळे महिलांना मोठा वाव या प्रदर्शनात मिळाला असल्याचे सांगितले. आमदार डॉ. आहेर यांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नवीन बदल आत्मसात करायला हवेत असे आवाहन केले. वाबळे इव्हेंटचे अजय वाबळे यांनी प्रास्ताविक केले.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास भुजाडे, द्राक्ष बागायतदार संघाचे कैलास भोसले, शिवनाथ बोरसे, शरद आहेर, पंढरीनाथ खताळ, वाल्मीक वानखेडे, पुंडलिक गुंजाळ, संतोष जामदार, राजेंद्र गांगुर्डे, प्रा. विजय शेलार, दिगंबर वाघ, अशोक व्यवहारे, बाळासाहेब माळी, संदीप उगले, राजाभाऊ गिडगे, आदींसह महिला व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Guardian Minister Dada Bhuse inaugurating the Renuka Agricultural Exhibition. Neighbor MLA Dr. Rahul Aher, Dr. Atmaram Kumbharde, Kailas Bhosale, Vikas Bhujade etc.
Dada Bhuse News: शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय : पालकमंत्री दादा भुसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.