Dada Bhuse: योजनांच्या लाभासाठी गावनिहाय मोहीम राबविणार : दादा भुसे

Guardian Minister Dada Bhuse felicitating Shiv Chhatrapati Awardee baseball player Manjusha Pagar at the revenue week closing ceremony.
Guardian Minister Dada Bhuse felicitating Shiv Chhatrapati Awardee baseball player Manjusha Pagar at the revenue week closing ceremony.esakal
Updated on

Dada Bhuse : शासनाच्या विविध विभागांच्या कल्याणकारी योजना व सेवा अधिकाधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमानतेने जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. महसुल सप्ताहाच्या माध्यमातून या कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना थेट मिळाला.

शासन योजनांच्या लाभापासून एकही गाव वंचित राहू नये, यासाठी जिल्ह्यात गावनिहाय मोहीम राबविणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी येथे सांगितले. (Dada Bhuse statement Village wise campaign will be conducted for benefit of schemes nashik)

येथील अग्रसेन भवनातील महसुल सप्ताह सांगता समारंभात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती,

प्रांताधिकारी नितीन सदगीर, उपविभागीय कृषी अधिकारी गोकूळ आहिरे, विराणे येथील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त बेसबॉलपट खेळाडू मंजूषा पगार, तहसीलदार नितीनकुमार देवरे, बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे,

तालुका कृषी अधिकारी भगवान बोर्डे, धान्य वितरण अधिकारी दीपक धिवरे, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. लक्ष्मण चव्हाण, गटविकास अधिकारी भरत वेंदे व्यासपीठावर होते. श्री. भुसे यांच्या हस्ते बेसबॉलपटू मंजूषा पगार हिचा सत्कार करण्यात आला.

श्री. भुसे म्हणाले, की महसूल दिन एक दिवसाचा न राहता सप्ताहाचा झाला. या माध्यमातून जिल्ह्यात विविध उपक्रम यशस्वीपणे पार पडले. नागरिकांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात शासन, प्रशासन यशस्वी झाले.

ज्यांच्याकडे अद्यापपर्यंत शिधापत्रिका नाही त्यांनी ई-शिधापत्रिका प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन शिधापत्रिका घ्यावी. कमीत कमी कागदपत्रांची पुर्तता करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी विशेष मोहीम गावपातळीवर राबवू.

जातीचे दाखल्यांसाठी विशेष मोहीम सुरु आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना शाळेतच लॅमिनेशन करून जातीचे दाखले देण्याचा मानस आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Guardian Minister Dada Bhuse felicitating Shiv Chhatrapati Awardee baseball player Manjusha Pagar at the revenue week closing ceremony.
Nashik News: काट्या-कूट्याचा तुडवित रस्ता, गावाकडे चल माझ्या दोस्ता! डोंगरकुशीत शाळेचे रंगले वनभोजन

संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सेवाभाव जोपासत गावागावातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. राज्यात पहिल्या पाचमध्ये हे काम आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, पीएम किसान योजना, एक रुपयात पीक विमा, संजय गांधी निराधार योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना लाभार्थींची संख्या वाढली आहे. प्रशासनाने सेवाभावी वृत्तीने काम केल्यास त्याचे समाधान मिळेल.

विभागीय आयुक्त श्री.. गमे म्हणाले की, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे काढण्यासाठी बँकेत जावे लागते.

यापुढे बँकेत न जाता ई-पेन्शनच्या माध्यमातून लाभ देण्यासाठी पोस्टामार्फत घरपोच पेन्शन विशेष मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येईल. लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत पुरुषांनी पत्नीचे नाव सातबारामध्ये लावावे असे आवाहन करताना विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.

श्री. शर्मा म्हणाले की, महसुल सप्ताहांतर्गत विविध योजनांचा लाभ देताना काही जुने झालेले नियम लक्षात आले. त्यांची नोंद घेऊन सूचनांचे संकलन करून शासनाकडे नियम अद्ययावत करण्यासाठी पाठविण्यात येतील. महसुल सप्ताहासारखे उपक्रम वर्षभर चालू राहतील.

श्रीमती पाटोळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना दाखले, धनादेश, प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले. जिल्हास्तरीय उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांना पुरस्कार वितरण पार पडले.

नैसर्गिक आपत्ती धनादेश वितरण, लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत सातबारा उतारा, संजय गांधी योजना (दिव्यांग, विधवा महिला) ई- रेशनकार्ड, गोल्डन कार्ड, उप अधीक्षक भूमी अभिलेख मोजणी नकाशा वाटप,

नगर भूमापन ड्रोन सर्वे सनद वाटप, अपंग प्रमाणपत्र वाटप, जातीचे दाखले / उत्पन्नाचे दाखले वितरण, शबरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा योजना, संजय गांधी योजना आदी विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देण्यात आले.

यावेळी नायब तहसीलदार संदीप धारणकर, रमेश खैरे, पुरवठा निरीक्षक अधिकारी प्रशांत काथेपूरी, उपअधिक्षक राहूल पाटील, नगरभुमापन अधिकारी किरण चौधरी आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व लाभार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. श्री. चावडे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. सदगीर यांनी आभार मानले

Guardian Minister Dada Bhuse felicitating Shiv Chhatrapati Awardee baseball player Manjusha Pagar at the revenue week closing ceremony.
Kotwal Recruitment: अनेक वर्षे रेंगाळलेली कोतवाल भरती लवकरच! अनुकंपाधारकांना प्राधान्य देण्याची वारसांची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.