नाशिक : जिल्ह्यात पर्यटन वाढीच्या अमाप संधी असून कृषी, धार्मिक, साहसी पर्यटन तसेच जिल्ह्यातील धरणे व नद्यांमध्ये जलपर्यटनाला मोठी संधी आहे. त्याअनुषंगाने संपूर्ण राज्यात लवकरच जलवाहतूक पर्यटन आराखडा तयार करण्याचे नियोजन असल्याचे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी माहिती दिली. (Dada Bhuse statment at Travels Expo Planning of water transport tourism in state nashik news)
ट्रॅव्हल्स असोसिएशन ऑफ नाशिक (तान) संघटनेतर्फे चोपडा लॉन्स येथे तीन दिवसीय ट्रॅव्हल्स एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले. पर्यटन वाढीसाठी मूलभूत सुविधा देण्याबरोबरच पर्यटनाशी संबंधित विविध घटकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तानचे अध्यक्ष सागर वाघचौरे म्हणाले, नाशिकच्या पर्यटन व्यवसायात ट्रॅव्हल एजंटचे मोलाचे योगदान असून, विश्वसनीय व दर्जेदार सेवा हे ट्रॅव्हल एजंटचे वैशिष्ट्य आहे. नाशिकमध्ये देश- विदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात व तेवढ्याच प्रमाणात बाहेरच्या देशांमध्ये जातात.
बाहेरून येणाऱ्या पर्यटनांसमोर नाशिकची छबी सकारात्मक होण्यासाठी सरकारच्या सर्व उपक्रमात ताण सक्रिय राहील. पर्यटन वाढीसाठी गोदा आरती सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय
या वेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, उपाध्यक्ष मनोज वासवानी, सचिव अरुण सूर्यवंशी, खजिनदार सचिन लोणारी, कमिटी सदस्य अमित चंडे, ईशान जोशी, अमरिश मोरे, प्रायोजक ब्रिज मोहन चौधरी, संजय कदम आदी उपस्थित होते.
तीन दिवस चालणाऱ्या एक्स्पोमध्ये नाशिकमधील साठहून अधिक ट्रॅव्हल्स व्यावसायिक सहभागी झाले आहेत. ॲडव्हेंचर, हनिमून बिझनेस, शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक, कृषी, आरोग्य अशा विविध प्रकारच्या पर्यटनाची माहिती एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सकाळी दहा ते रात्री नऊ अशी प्रदर्शनाची वेळ आहे. प्रदर्शनामध्ये ज्ञानवर्धक सेमिनार, ग्राहकांसाठी देश-विदेशातील पर्यटनाचे असंख्य पर्याय ऑफर्स देखील दिल्या जाणार आहे, प्रदर्शनात भेट देण्याचे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले आहे,
गोदा आरती सुरू व्हावी
नाशिकमध्ये धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे गंगा आरतीच्या धर्तीवर गोदा आरती हा उपक्रम सुरू करण्याची मागणी या वेळी असोसिएशनतर्फे करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.