Nashik News : निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सहकार क्षेत्रातील भिष्माचार्य ओळखले जाणारे प्रल्हाद पाटील तथा दादासाहेब कराड यांचे निफाड येथे वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. (Dada Pralhad Patil Karad passed away in cooperative sector nashik news)
१९८० च्या कालखंडामध्ये शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उभारलेल्या शेतकरी आंदोलनाला बळ देण्याचे काम प्रल्हाद पाटील कराड यांनी केलेले होते.
साखर कारखान्याचे खाजगीकरण करण्याची मोहीम सुरू झाल्यानंतर गोदकादवा हा राज्यातील पहिला खाजगी सहकारी साखर कारखाना देखील उभारण्याचे श्रेय प्रल्हाद पाटील कराड यांच्याकडे जाते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यांचा अंत्यविधी सोमवार दि.१७ रोजी सकाळी ९ वाजता जळगाव ( निफाड ) स्मशानभूमीत होणार आहे. त्यांच्या पश्चात ६ मुले, २ मुली, सूना नातवंडे असा परिवार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.