Nashik : तब्बल 821 दिवसांनंतर फाळके स्मारक खुले

Families enjoying at Dadasaheb Phalke Memorial
Families enjoying at Dadasaheb Phalke Memorialesakal
Updated on

इंदिरानगर (जि. नाशिक) : नाशिककरांचे आवडते आणि कोरोनामुळे (Corona) बंद असलेले फाळके स्मारक तब्बल ८२१ दिवसानंतर सर्वांसाठी खुले झाले. गुरुवारी (ता. १६) पहिल्याच दिवशी सायंकाळी साडेसातपर्यंत १७९ प्रौढ आणि ११७ लहान, अशा २९६ जणांनी फाळके स्मारकाला (Phalke Memorial) भेट दिली. मनपा आयुक्त रमेश पवार (NMC commissioner) यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा सुरू झाल्याने फाळकेचे पूर्वी असणारे वैभव परत मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. (Dadasaheb Phalke memorial opened after 821 days Nashik News)

श्री रोहित आणि प्राजक्ता भोसले या दाम्पत्याने तर फ्री- मॅटर्निटी शूटसाठी स्मारकाची निवड केली.
श्री रोहित आणि प्राजक्ता भोसले या दाम्पत्याने तर फ्री- मॅटर्निटी शूटसाठी स्मारकाची निवड केली. esakal

बुद्ध स्मारक आणि पांडवलेणी भागात फेरफटका मारण्यासाठी आलेल्या पर्यटकांना फाळके स्मारकातदेखील विनामूल्य प्रवेश मिळत असल्याचे बघून सुखद धक्का बसला. या ठिकाणी असलेली हिरवळ पुन्हा पूर्वीसारखी बहरली असून, खेळणी विभागात नव्याने घसरगुंडी, झोके रहाटगाडगे आदी खेळण्या बसविल्या आहेत. पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. येथे कायमच आकर्षण असलेला पाण्याचा संगीत कारंजादेखील सुरू करण्यात येणार असून, सुपरहिट झालेल्या चित्रफितीवर आधारित आणि झगमगत्या लाईट्सच्या साहाय्याने असणारे कारंजेदेखील लवकर सुरू करावेत, अशी अपेक्षा पर्यटकांनी व्यक्त केली आहे. १६ जून २०२० ला कोरोनामुळे फाळके स्मारक बंद केले होते.

Families enjoying at Dadasaheb Phalke Memorial
Nashik : शेतीच्या वादातून भावाचा खून
लहान मुलांनी मनसोक्त आनंद घेतला.
लहान मुलांनी मनसोक्त आनंद घेतला.esakal

३० जूननंतर बारा वर्षांखालील मुलांसाठी मोफत, १२ ते १८ वर्षापर्यंत पाच रुपये आणि त्यापुढील व्यक्तींसाठी प्रत्येकी दहा रुपये शुल्क साधारण असेल, अशी माहिती महापालिका अधिकारी जे. के. कहाणे यांनी दिली. पहिल्याच दिवशी अनेकांनी कुटुंबासह येथे येत वेळ घालवला. सोबत अनेकांनी फोटोसेशनसाठी या ठिकाणच्या वेगवेगळ्या जागांची निवड केली. श्री रोहित आणि प्राजक्ता भोसले या दाम्पत्याने तर फ्री- मॅटर्निटी शूटसाठी स्मारकाची निवड केली. कायमस्वरूपी खुले ठेवावे, अशी अपेक्षा रवींद्र पाटील आणि कुटुंबीयांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()