Ram Lalla Pran Pratishtha : ‘दगडू तेली’ वैभवशाली वनस्पती विज्ञानाचा वसा; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रभू श्रीरामचरणी

अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Ram Lalla Pran Pratishtha
Ram Lalla Pran Pratishthaesakal
Updated on

Ram Lalla Pran Pratishtha : अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतातील कानाकोपऱ्यांतून नागरिक आपले योगदान देऊन प्रभू श्रीरामचरणी आपली सेवा अर्पित करीत आहेत. अयोध्या नगरीत येणारे विविध साहित्य हे उच्च गुणवत्तेचे यावे, यासाठी विशेष व्यवस्था कार्यरत आहे.

नाशिककरांसाठी अभिमानाची बाब म्हणजे, प्रभू श्रीरामाच्या पूजनासाठी आवश्यक सामग्री ‘दगडू तेली चांदवडकर’ यांच्याकडून अयोध्या नगरीत दाखल झाली आहे. (Dagdu Teli is treasure of glorious botanical science for ayodhya ram mandir nashik news)

१२५ वर्षांहून अधिक काळ नाशिककरांच्या विश्वासाचे ग्राहकांना आवश्यक सर्व पूजेचे सामान, आयुर्वेदिक औषधी, किराणा सामानाच्या गरजा भागवणारे म्हणून दगडू तेली चांदवडकर परिचित आहेत. अयोध्येत सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा पूर्व कार्यापासूनच नाशिक येथून पाठविलेल्या पूजन साहित्याचा वापर सुरू झाला आहे.

हे कार्य घडवून आणण्यात आम्हाला अशोक पर्वतराव देवकर यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. तसेच हे साहित्य अयोध्येपर्यंत पोहोचविण्यात आम्हाला अमूल्य मदत स्मार्त चूडामणी शांतारामशास्त्री मोहिनीराज भानोसे गुरुजी, देवेंद्र पसरणीकर गुरुजी, हेमंत धर्माधिकारी गुरुजी, सदानंद टोके गुरुजी, संकेत टोके गुरुजी, नंदकिशोर हरकुट यांनी केली.

Ram Lalla Pran Pratishtha
Ram Lalla Pran Pratishtha : येवल्यात कारसेवकांचा गौरव; रामभजन संध्येत रामभक्त मंत्रमुग्ध

गेल्या १२५ वर्षांहून अधिक काळापासून नाशिककरांनी दाखविलेल्या विश्वासाने आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि दगडू तेली चांदवडकर समस्त नाशिककरांच्या वतीने प्रभू श्रीरामचरणी सेवा देऊ शकलो. यात आम्हाला आनंद आहे, असे ‘दगडू तेली’चे संचालक नंदलाल दत्तात्रय चांदवडकर आणि अरुण दत्तात्रय चांदवडकर यांनी सांगितले.

चंपकपत्र, सशर्प, विष्णुकांता, बेलचुर्ण, मुरा, मासी, रुद्धी, अपराजी, हिराडा, मंडूर भस्म, नागरमोथा, शतावरी, सैंधव मीठ, वेखंड, जटामांसी, वाळा, कुटकी, समुद्रफेस, गुगुळ, कमळकाकडी, तुकुमराई, ब्राह्मी, शंखपुष्पी, कापूरकाचली, बेहडा, बेलफळ, दशऔषधी, दशमूळ भरड, सहदेवी, नागकेशर, अष्टवर्ग, दारुहळद, आंबेहळद, मुरडशेंग, ज्येष्ठमध, सुंठ, वेखंड, केशर, लवंग, वेलदोडे, जायपत्री व दगडू तेली यांची हवन सामग्री, धार्मिक कार्यात आवश्यक आणि महत्त्वपूर्ण उत्तम गुणवत्तेचे साहित्य दगडू तेली चांदवडकर यांच्याकडून अयोध्येत प्रभू श्रीरामचरणी अर्पण करण्यासाठी पाठविले गेले आहे.

गुणवत्ता आणि विश्वासार्हतेला राष्ट्रीय परिमाण

दगडू तेली चांदवडकर नेहमीच उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करतात. विविध पारंपरिक आयुर्वेदिक औषधी ग्राहकांना पुरवून, त्यांच्या आरोग्य समस्या बरे करण्याचा प्रयत्न करतात. आयुर्वेद हा भारतीय पारंपरिक वारसा आहे आणि दगडू तेली चांदवडकर हा वारसा जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. अयोध्येत श्री रामलल्लाच्या सेवेत दगडू तेली चांदवडकर यांनी पाठविलेल्या पूजन साहित्यामुळे त्यांच्या गुणवत्ता आणि विश्वासार्हतेला राष्ट्रीय परिमाण प्राप्त होत आहे.

Ram Lalla Pran Pratishtha
Ram Lalla Pran Pratishtha : एकही नारा, एकही नाम ‘जय श्रीराम’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.