Women Employment : गृह उद्योगातून 12 हजार महिलांना रोज रोजगार; पापड, शेवया, कुरडया बनवण्यास सुरवात

Women Employment
Women Employmentesakal
Updated on

Women Employment : विविध प्रकारचे पापड, शेवया व कुरडया बनवून ग्राहकांपर्यंत पोचविणाऱ्या महिलांना गृहउद्योगाने आर्थिक सक्षम बनवले आहे. शहराच्या विविध भागात पसरलेल्या अशा गृहउद्योगांनी सुमारे १२ ते १५ हजार महिलांना नियमित रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

नोकरी करणाऱ्या महिलांना मनाप्रमाणे वाळवणीचे पदार्थ मिळत असल्याने या पदार्थांना दिवसेंदिवस मागणीही वाढत असल्याचे दिसून येते. (Daily employment of 12 thousand women through home industry Start making papad sevaya, kurdaya nashik news)

मार्चमध्ये अवकाळी पावसामुळे पाहिजे त्या प्रमाणात वाळवण बनविता आले नाही. आता एप्रिल व मेमध्येच वर्षभराचे नियोजन करावे लागणार आहे. नोकरी करणाऱ्या किंवा ज्यांना स्वत: पापड, शेवया, कुरडया बनवणे शक्य नाही, अशा महिला तयार वस्तु विकत घेतात.

महिला बचत गटांनी यातही आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे अत्याधुनिक मशिन्समुळे काही मिनिटांमध्ये २ ते ५ किलोपर्यंतचे पापड तयार होतात. उडीद, नागलीचे विविध आकाराचे पापड तयार करुन देणाऱ्या महिलांच्या उद्योगाने सध्या चांगलीच भरारी घेतली आहे.

शहरात विशेषत: सिडको, सातपूर, म्हसरुळ, नाशिक रोड, डीजीपीनगर, कामटवाडे या भागात गल्लोगल्ली महिला गृह उद्योग उभे राहिल्याचे दिसून येते. येथे फक्त रेडीमेड वस्तुच मिळतात असे नाही, तर ग्राहकांनी स्वत: साहित्य पुरवल्यास फक्त मजुरी घेवून त्यांना हे पदार्थ बनवून दिले जातात.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Women Employment
Weather Forecast : जिल्ह्यातील काही भागामध्ये 2 दिवसांमध्ये मध्यम पाऊस

पापडांचे प्रकार

जेवणासोबत चवदार पापड हा लागतोच. म्हणून विविध प्रकारचे पापड बनवताना विशेष काळजी घेतली जाते. यात लाल तिखटाचे पापड, जिरा पापड, ओवा पापड, लवंगाचे पापड, नागली व उडीद पापड प्रसिद्ध आहेत. मुगडाळ व उडदाच्या डाळीपासून हे बनवले जातात. डाळींना रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी पापड बनवतात. त्यामध्ये ओवा, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घातले जाते.

"अवकाळी पावसामुळे संपूर्ण मार्च महिना वाया गेला. आता एप्रिल व मेमध्ये पापड, कुरडया, शेवयांना सर्वाधिक मागणी असते. आमच्याकडे विविध प्रकारच्या वस्तु बनवून मिळतात. त्यामुळे महिलांची आमच्याकडे गर्दी वाढत आहे."

-सुरेखा ताकाटे, साफल्य महिला उद्योग, कामटवाडे

"घरगुती पद्धतीने बनवलेल्या गव्हाच्या कुरडया, नागली पापड, तांदळाचे पापड, बटाटा पापड, वडे, वेफर्स, चकली, शेवया आदी वस्तुंना होलसेल दरात मागणी असते. केवळ नाशिकच नाही, तर नाशिक बाहेरूनही ग्राहक येतात. खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे."

-हर्षदा पिंगळे, जय भोले गृहउद्योग, मखमलाबाद

"सुरवातीला मिरची, मसाले बनवण्याचा विचार मनात आला. उत्तम दर्जा आणि ग्राहकांच्या सूचना पाहून आनंद झाला. महिलांना रोजगार मिळेल या उद्देशाने आम्ही अन्य पदार्थही बनवू लागलो. उत्तम दर्जा आणि सेवा पाहून भरघोस प्रतिसाद मिळू लागला."

-प्रियंका पिंगळे, मातोश्री महिला गृहउद्योग, मखमलाबाद

Women Employment
Nashik News: वैयक्तिक सुनावणी प्रकरणात 5 दिवस आधी नोटीस द्यावी! उच्च न्यायालयाने राज्य शासनास फटकारले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()