आदिवासी महिलांची बल्ल्यावरुन पाण्यासाठी पुन्हा रोजची जीवघेणी कसरत

आदित्य ठाकरेंनी तास नदीवर उभारलेला पूल पुरात गेला वाहून ; मंजूर कामे अजूनही हवेत
tribal women facing difficulty to get water
tribal women facing difficulty to get water esakal
Updated on

नाशिक : शेंद्रीपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील आदिवासी महिलांना (Tribal women) दररोज पिण्याच्या पाण्यासाठी (Drinking Water) बल्ल्यांवरुन तास नदी जीव मुठीत घेऊन ओलांडावी लागत होती. त्याचे वृत्त ‘सकाळ'मधून प्रसिद्ध होताच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadhi Government) तत्कालिन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दखल घेतली आणि तीन दिवसांमध्ये लोखंडी पूल उभारला गेला.

पूल पाहण्यासाठी श्री. ठाकरे स्वतः इथं आले होते. आताच्या मुसळधार पावसात मात्र तास नदीला आलेल्या पुरात लोखंडी पूल वाहून गेला. त्यामुळे इथल्या महिलांची पुन्हा पिण्याच्या पाण्यासाठी बल्ल्यांवरील जीवघेणी कसरत सुरु झालीयं. (daily life threatening exercise of tribal women to get water from the balli nashik latest Marathi news)

लोखंडी पुलामुळे महिलांसह विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास बंद झाला होता. श्री. ठाकरे यांच्या भेटीवेळी इथल्या आदिवासी बांधवांसाठी आठ ते दहा कोटींची कामे मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. त्यात दोन पूल, विहीर,घराजवळ वीज, रस्ता आदी कामांचा समावेश होता.

प्रत्यक्षात मात्र आदिवासी बांधवांसाठी मंजूर झालेली कामे अजूनही हवेत आहेत. इथे आतापर्यंत ना रस्ता झाला आणि ना वीज आली. विहिरीसाठी स्थानिकांनी जागा देऊनही विहीर खोदण्यात आली नाही.

अडीच ते तीन हजार लोकसंख्येच्या या भागातील अनेक कुटुंबे शेतीसाठी दीड किलोमीटर अंतरावरील तास नदीच्या काठी राहतात. परिसरातील पंचवीस वस्त्यांमधील आदिवासी कुटुंबांची संख्या तीनशेहून अधिक आहे.

तास नदी जवळून असूनही शुद्ध पाणी मिळत नसल्याने पिण्यासाठी जिवंत झरे शोधून तेथून पाणी घरी आणतात. या दरम्यान, त्यांना तास नदी ओलांडावी लागते.

tribal women facing difficulty to get water
विवाहानंतर 12 वर्षांनी मिळाले कुटुंबाला पूर्णत्व; नाशिकचे नाव विश्वात अधोरेखित!

आदिवासी कुटुंबांसाठी टाकी बांधली आहे. पण ती अशा ठिकाणी आहे, की तेथून पाणी आणणे अवघड आहे. गरज आहे, तिथे टाकी न उभारता भलतीकडे टाकी उभारल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

हरसूल मार्गे पेठकडे जाण्यासाठी हा मार्ग असल्याने अनेकजण पावसाळ्यात नदीच्या प्रवाहातून प्रवास करतात. त्यामुळे स्वाभाविकपणे आदिवासींच्या या दुखण्याची दखल नेमकी कधी घेतली जाणार? असा यक्ष प्रश्‍न उभा ठाकला आहे.

राजकीय गदारोळात होऊ नये उपेक्षा

राज्यातील सत्तांतरानंतर राजकीय गदारोळ सुरु झाला आहे. अशा परिस्थितीत उपेक्षा होऊ नये, अशी अपेक्षा आदिवासी बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मदतीला यापूर्वी धावून आलेले आदित्य ठाकरे हे गुरुवारी (ता. २१) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पुन्हा कसा प्रतिसाद मिळणार याकडे आदिवासी बांधवांची नजरा खिळल्या आहेत.

tribal women facing difficulty to get water
Nashik : स्वीमिंग टँकमधून बुडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.