नाशिक : शहराच्या विविध भागात विशेषतः रविवार कारंजा, शालिमार, अशोक स्तंभ, घारपुरे घाट, खडकाळी सिग्नल येथील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या अनेक भागात वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी एकेरी मार्ग असूनही सर्रास दुसऱ्या बाजूने वाहने येत असल्याने या कोंडीत भरच पडत आहे. (daily Traffic jam in city Nashik Latest marathi news)
शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास घारपुरे घाटात वाहतुकीची मोठी कोंडी झाली. जवळपास तासभर अनेक वाहने जागेवरच उभी होती. घारपुरे घाटात अशोक स्तंभ, गुरांचा दवाखाना तसेच पंचवटीसह पृथ्वीराजशेट निमाणी चाळीकडे जाणारा रस्ता अशी चौफुली आहे.
दुपारच्या सुमारास एक घंटागाडी या ठिकाणी अडकून पडल्याने वाहनांच्या रांगा लांबवर पोचल्या होत्या. त्यामुळे अनेकांनी यू- टर्न घेत पाठीमागे फिरणे पसंत केले. अशोक स्तंभ ते रविवार कारंजा, रविवार कारंजा ते टिळक पथ सिग्नल, मालेगाव स्टॅन्ड ते रामकुंड असे काही महत्त्वाचे एकेरी मार्ग आहेत.
मात्र, अनेकजण स्वतःचा अधिकार असल्यासारखे एकेरी वाहतुकीच्या मार्गात शिरतात. पोलिसांनी दंडात्मक कारवाई केल्यास या प्रकाराला आळा बसू शकतो. पण त्यासाठी मानसिकता हवी, अशी प्रतिक्रिया एका वाहनचालकाने व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.