तौक्ते चक्रीवादळाचा दणका; जिल्ह्यात २७८ घरे अन्‌ ८०० हेक्टरचे नुकसान

farm
farmesakal
Updated on

नाशिक : तौक्ते चक्रीवादळ (tauktae cyclone) आणि अवकाळी पावसामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, देवळा, चांदवड, निफाड, सिन्नर तालुक्यांतील २७८ घरांचे नुकसान (damage) झाले. तसेच देवळ्यातील ०.३० आर भाजीपाल्याचे अन् सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर, पेठ तालुक्यांतील ७९६.३० हेक्टरला व सिन्नरमधील दोन हेक्टर डाळिंबाचे, असे एकूण ८०० हेक्टरला फटका बसला आहे. (Damage caused by cyclone Tauktae)

जिल्ह्यातील २७८ घरांचे अन्‌ ८०० हेक्टरचे नुकसान

तालुकानिहाय मालमत्तांचे झालेले नुकसान असे - इगतपुरी-दोन घरे. त्र्यंबकेश्‍वर- ३० घरे, एक समाजमंदिर, जिल्हा परिषदेच्या तीन शाळा, एक अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र एक, गोरक्षनाथ ट्रस्टचे मंदिर एक, शेडनेट एक. पेठ- ६५ घरे. सुरगाणा- ११२ घरे, चार प्राथमिक शाळांचे पत्र उडाले, तीन अंगणवाड्यांचे पत्रे उडाले, प्राथमिक दोन आरोग्य उपकेंद्र. दिंडोरी- आठ घरे. कळवण- ५६ घरांची पडझड. देवळा- एक घराचे पत्रे उडाले, एक कांदा शेडचे नुकसान. चांदवड- एक कच्च्या घराचे अंशतः नुकसान. निफाड- एक घराचे पत्रे उडाले. सिन्नर- दोन घरांचे पत्रे उडाले. याशिवाय देवळा तालुक्यातील एक गावातील एका शेतकऱ्याच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. सुरगाणा तालुक्यातील १३० गावांमधील दोन हजार ५४१ शेतकऱ्यांना ५८१ हेक्टरवरील, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील आठ गावांतील ४५ शेतकऱ्यांच्या दहा हेक्टरवरील, पेठ तालुक्यातील ४५ गावांतील एक हजार ४८० शेतकऱ्यांच्या २०५.३० हेक्टरवरील आंब्याला दणका बसला आहे.

farm
VIDEO : नाशिकच्या बिटको रुग्णालयात शॉर्टसर्किट; सुदैवाने जीवितहानी नाही

द्राक्षांच्या फांद्या-काड्या तुटल्या; आदिवासी भागातील आंब्याला फटका

याशिवाय साल्हेर भागातील आंब्याचे नुकसान झाले आहे. अंतापूरमधील घरावरचे पत्रे उडाले आहेत. कवडरा येथे झाड कोसळून घराचे नुकसान झाले आहे. दिंडोरी तालुक्यात झाडे उन्मळली असून, पत्रे उडाले आहेत आणि द्राक्षवेलीच्या काड्या मोडल्या आहेत. निफाड तालुक्यातील द्राक्षवेलींच्या फांद्या तुटल्या आहेत.

farm
बिल तपासणीत हलगर्जीपणा, दोन लेखापरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

२४ तासांत १३.६ मिलिमीटर पाऊस

वादळी वाऱ्यासह सोमवारी (ता. १७) सायंकाळपासून अवकाळी पावसाने दणका देण्यास सुरवात केली. पहाटे शहर आणि परिसरात पावसाचा वेग अधिक होता. तसेच बहुतांश भागात हवामान ढगाळ राहिले. २४ तासांत नाशिकमध्ये १३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चक्रीवादळामुळे आतापर्यंत झालेल्या पावसाची ३६.९ मिलिमीटर इतकी नोंद झाली आहे. सोमवारी (ता. १७) वाऱ्याचा वेग ताशी १८ किलोमीटर राहिला. तो हळूहळू कमी होत ताशी १३ किलोमीटरपर्यंत राहिला. आज वारे ताशी सात किलोमीटर या वेगाने वाहत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.