The deplorable state of roads in Ajitnagar area
The deplorable state of roads in Ajitnagar areaesakal

Damage Road : कॉलनी रस्ते दुरूस्तीला कधी लागणार मुहूर्त? नागरिकांकडून नाराजी

Published on

Damage Road : शहराच्या हद्दवाढीनंतर झपाट्याने अनेक भागात नव्या वसाहती वाढत आहेत. मात्र, शहरातील अनेक वर्षांपासूनच्या चर्च- कृषिनगर भागातील कॉलन्यांमधील रस्त्यांबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Damage Road Colony road repair time Resentment from citizens at malegaon camp nashik news)

शहरातील चौफेर भागात झपाट्याने नवनवीन घरे व बंगल्यांचे बांधकाम होत आहेत. मात्र, गेल्या दहा बारा वर्षांपासून रहिवासी असलेल्यांना अद्याप रस्ता, दिवाबत्तीसारख्या सुविधा उपलब्ध न झाल्याने महापालिका प्रशासनाबद्दल नापसंती व्यक्त होत आहे.

कृषिनगर व चर्चच्या पाठीमागील परिसर, पीडब्लूडी ऑफिसच्या पाठीमागील भागात, अंतर्गत छोट्या कॉलन्यांमध्ये रस्तेच नसल्याने दळणवळणासह दैनंदिन शहरात ये जा करणारे नागरिक, शाळकरी विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट होते.

विशेष म्हणजे या परिसरात काळ्या मातीमुळे पावसाळ्यात चार ते पाच महिने चिखलात वाट तुडवत रस्ता काढावा लागतो. काही ठिकाणी जुने झालेल्या रस्त्यांवर खडी मोकळी झाली, तर काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.

अनेक ठिकाणी पाणीपुरवठा जलवाहिनी फुटल्याने, कामासाठी खोदकाम केल्यावर अर्धवट बुजवल्याने खड्डे निर्माण झाले आहेत. भूमिगत गटारीचे अंतर्गत नियोजन नसल्याने काही ठिकाणी महिलांनी महापालिकेबाबत रोष व्यक्त केला.

नगरसेवकांचे अपयश

भाग्योदय कॉलनीतील महिलांनी रस्त्याचे काम थांबविल्याची घटना ताजी असतानाच काही भागात नागरिकांनी वर्गणीच्या माध्यमातून स्वतःच मुरूम टाकून रस्ता बनविलेला आहे. चर्च गेटमागील वसाहती, कृषिनगर परिसरातील उपनगरांत रस्ते नसल्याने व पाणी निचऱ्याची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते.

त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते. नागरिकरणाचा वाढता वेग लक्षात घेऊन विकास आराखड्यासाठी रस्ते आखण्यात आले. मात्र, ते कागदावरच राहिले. रखडलेले रस्ता रुंदीकरण, पर्यायी रस्त्यांचा अभाव यामुळे नागरिकांना गैरसोईला सामोरे जावे लागत असून, रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लावण्यात नगरसेवकांना सपशेल अपयश आल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

The deplorable state of roads in Ajitnagar area
Mahavitaran Rate Hike : बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॉक! महावितरणकडून महागाईच्या आगीत तेल

या सुविधांची वानवा:

* मुख्य व कॉलनी अंतर्गत रस्त्यांच्या समस्या कायम

* काही भागात रस्ते मंजूर, मात्र कामे रखडली

* नवीन कॉलनीत रस्ते, तर जुन्या कॉलनीतील रस्ते प्रतीक्षेत

* पावसाळ्यात गुडघ्या इतके पाणी साचते, नागरी जीवन विस्कळीत होते

* कॉलनीत अंतर्गत पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य

मुलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या कॉलनी

जलधारा कॉलनी, एकनाथनगर, भाग्योदय, ओंकार कॉलनी, एकतानगर, राजमाता जिजाऊनगर, संभाजीनगर, शाकंबरी कॉलनी, बच्छाव मळा परिसर, तुलसीधननगर, वृंदावन कॉलनी, अजितनगर, अभिनव शाळा परिसर.

"महापालिकेच्या माध्यमातून घरपट्टी व कर वसुलीसाठी जशी मोहीम राबविण्यात येते, तशीच मोहिम सुविधांच्या बाबतीत गरजेची आहे. प्रत्येक कॉलनीत रस्ता व लाईट, पाणी पुरवठा महत्वपूर्ण आहे. याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात यावे."-अनिल काळे, सामाजिक कार्यकर्ते

"अनेक वर्षांपासून पक्के रस्ते नसल्याने पावसाळ्यात घराबाहेर निघणे अवघड होते. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. मानव पार्क ते वृंदावन कॉलनी भागात रस्त्याची दुरावस्था आहे. रस्त्याच्या मधोमध इलेक्ट्रिक पोल आहेत, ते काढणे महत्त्वाचे आहे."

-कविता शिवाजी चव्हाण, गृहिणी, कृषिनगर.

The deplorable state of roads in Ajitnagar area
Market Committee Election : देवळ्यात 8 जागा बिनविरोध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.