Nashik News: समृद्धी कामामुळे शेतजमिनींचे नुकसान; उपोषणाचा इशारा

Giving a statement to the Tehsildar for the demand for correction
Giving a statement to the Tehsildar for the demand for correctionesakal
Updated on

Nashik News : तालुक्यातील मौजे पिंपळगाव मोर येथे सुरू असलेल्या समृद्धी महामार्ग व पुलाच्या कामासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतातील माती उपसा करून शेत जमिनींचे नुकसान केले.

त्यामुळे शेती कशी करायची व पाणी कसे भरायचे अशा पेचात अडकलेल्या शेतकऱ्यांनी अनेक वेळा समृद्धी कंपनी व्यवस्थापनाकडे तक्रार केली, मात्र कंपनी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. ४) शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात तहसीलदार अभिजित बारावकर यांना निवेदन देत उपोषणाचा इशारा दिला. (Damage to agricultural lands due to Samriddhi work Subordinate mineral extraction demand for repairs to Tehsildar nashik)

निवेदनाचा आशय असा : समृद्धी कामासाठी अनेकांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. राहिलेल्या शेत जमिनीतून गौण खनिज उत्खनन करण्यात येत आहे. समृद्धी महामार्ग व्यवस्थापनाच्या विविध ठेकेदारांनी मनमानी पद्धतीने काम करून अनेक शेतकऱ्याच्या पाइपलाइन तोडून त्यावर दगड मातीचे ढिगारे तयार केले आहे.

२०२१ पासून समृद्धी कंपनीमुळे संपादित जमिनी सोडून इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शेतांचे नुकसान करून खासगी पाइपलाइन, माती दगडाखाली दाबून गावाचा पाणीपुरवठा बंद केला आहे, झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई द्यावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा निवेदनात देण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Giving a statement to the Tehsildar for the demand for correction
Nashik News: इगतपुरी पंचायत समितीतील सुशोभीकरण कामाची दुरवस्था; स्वच्छतेकडे दुर्लक्ष

या प्रसंगी समृद्धी कंपनीच्या वतीने जेव्हीपीआर कंपनीचे व्यवस्थापक रमेश रेड्डी, समन्वयक समाधान शिंदे, अविनाश गुंजाळ उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत शेतकऱ्यांना आश्वासन दिले.

शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख बाळासाहेब धुमाळ, जिल्हा नेते किसन शिंदे, शेतकरी रामदास काळे, भाऊराव काळे, मधुकर बेंडकोळी, कांतिलाल काळे, गणपत कदम, त्र्यंबक कदम, रमेश कदम, भगवंता सोनवणे,

मधुकर गातवे, संजय कदम, जगन कदम, भीमा काठे, बारकू काळे, भाऊराव कुंदे, काळू बेंडकोळी, रामदास काळे, सदाशिव काळे, लक्ष्मण काळे, नंदू बांगर, लक्ष्मण काळे, इंदुबाई भवारी, सिंधुबाई डगळे, राजाराम काळे, संजय मदगे, संपत कदम आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Giving a statement to the Tehsildar for the demand for correction
Monsoon Agriculture: मक्याचे क्षेत्र घटणार, कांद्याचे वाढणार! पावसाने उशीर केल्याने बदलली गणितं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.