Damini Marshall Squad: रोडरोमिओ, टवाळखोरांविरोधात ‘दामिनी मार्शल’! पथकाचे पालकमंत्र्यांचे हस्ते उद्‌घाटन

शहर पोलिसात महिलांच्या ‘दामिनी’ पथकाचे पालकमंत्र्यांचे हस्ते उद्‌घाटन
Damini Marshall Squad
Damini Marshall Squadesakal
Updated on

Damini Marshall : शहरातील महिला, मुलींना अधिक सुरक्षितता वाटावी आणि रोडरोमिओ, टवाळखोरांना धडा शिकविण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत दामिनी मार्शल्स सज्ज झाले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयात दामिनी मार्शल्सला हिरवा झेंडा दाखवून उद्‌घाटन करण्यात आले. (Damini Marshall against robbers Rodromeo Inauguration of team by guardian minister dada bhuse nashik news)

दामिनी पथकाच्या उद्‌घाटनप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी, मोनिका राऊत यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

अल्पवयीन बेपत्ता मुला-मुलींच्या शोधासह इतर महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथकांच्या जोडीला आता शहरात महिला दामिनी बीटमार्शल्स सज्ज आहेत.

आयुक्तालयातील १४ पोलीस ठाण्यांतर्गंत महिला अत्याचार, गुन्ह्यांना आळा घालण्यासह, टवाळखोरांवर कारवाईसाठी पोलीस ठाणेनिहाय दामिनी मार्शल्स २४ तास तैनात राहणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Damini Marshall Squad
Police Medal: सहायक आयुक्त वाघ यांना राष्ट्रपती पोलीस पदक; सहायक उपनिरीक्षक लभडे, जाधव, गडाख यांनाही पदक

‘दामिनीं’ची दुचाकीवरून गस्त

दामिनी मार्शल्समध्ये ४४ महिला पोलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी ११ मोटारसायकलीवरून आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दामिनी मार्शल्स नियमित गस्तीवर राहतील. यावर परिमंडळीय उपायुक्तांचे नियंत्रण असणार आहे.

करडी नजर

शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, बाजारपेठा, महिला वसतीगृहे, सिनेमा हॉल, उद्याने याठिकाणांसह महिला, मुलींची छेडछाडीच्या ठिकाणी रोमरोमिओ, टवाळखोरांवर कारवाई करणार आहे.

तसेच, टवाळखोरांचा शोध घेऊन त्यांचे चित्रीकरणही केले जाईल. तक्रारदारांनीही टवाळखोरांबाबत दामिनी पथकाला माहिती कळविण्याचे आवाहन शहर आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

Damini Marshall Squad
Nandurbar News: दुर्गम गावातील शेतकऱ्याचा पंतप्रधानांच्या हस्ते होणार सन्मान!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.