Water Crisis : उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक धरणे असलेल्या इगतपुरी तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या. धरणालगतच्या वाड्यापाड्यांवर पाण्याचे स्तोत्र आटल्याने सिंचन क्षेत्रासह पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्या जाणवत आहे.
त्यात इगतपुरी तालुक्यातील मोठ्या धरणांमध्येही यापूर्वीच नियोजनबाह्य पाण्याचे आवर्तन केल्याने धरणसाठाही तळाशी आला आहे.
तालुक्यातील भाम, वाकी या धरणांमध्ये आता केवळ मृतसाठा असून त्याच्या भरवशावर राहणे अशक्य आहे. भावली धरणातही अवघा बारा टक्के साठा शिल्लक राहिला आहे. (Dams dry with unplanned circulation Only dead stock in Waki Bham dams nashik news)
जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस इगतपुरी तालुक्यात होतो. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला समाधानकारक वातावरण होते. पंधरा ऑगस्टपर्यंत तालुक्यात पाणी पुरेल अशी स्थिती होती.
मात्र दुरुस्तीच्या नावाखाली वाकी धरण व नियोजनाअभावी भाम धरणातून गेल्या अडीच तीन महिन्यापासून सलग व अखंडीतपणे विसर्ग सुरू राहिल्याने धरणातील साठा संपुष्टात येऊन आजच्या स्थितीत ही दोन्ही धरणे कोरडीठाक झाली.
आजस्थितीत या दोन्ही धरणात उपयुक्त साठा शून्य टक्के झाला आहे. मृत साठ्यावर या धरण परिसरतील गावांच्या पिण्याच्या पाण्याची स्थिती अवलंबून आहे.
भावली धरणात आजअखेर फक्त १२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अर्ध्या तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी दिलासा देणाऱ्या या धरणाची ही जलस्थिती पाहून तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनालाही यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सातत्याने प्रवाहित राहणाऱ्या भाम, वाकी-खापरी, दारणा या नद्याही कोरड्याठाक झाल्याने बहुतांश वाडी- पाडे, यांच्यासह जनावरे व शेतीच्या पाण्याच्या बाबतीत गंभीर स्थिती दिसत आहे. दारणा धरणात आज स्थितीत ३९ टक्के, मुकणे धरणात ४२ टक्के, तर कडवा धरणात केवळ २४ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.
गाळमुक्त धरण योजनेला मुदत वाढवा
भविष्यात भावली धरणातून शहापूर, घोटी, इगतपुरी शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन युद्धपातळीवर कामकाज सुरु आहे. जलसंपदाचे नियोजन अशाच प्रकारे राहिले तर आजच्या स्थितीत भीषणता राहिल्यास भविष्यात पाणीवाटप जलसंपदा कशा पद्धतीने होईल यावर शंका निर्माण होत आहे.
धरणातील जलसाठा क्षमता वाढवण्यासाठी शासनाने गाळमुक्त धरण योजनेला अधिक मुदत देऊन सिंचन व्यवस्था मजबूत करणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.