निफाड (जि.नाशिक) : आजकाल प्रसिध्दीसाठी लोकं काय करतील याचा नेम नाही. एका शेतकरी कामगाराच्या मुलाने उसतोडणी सुरू असताना चक्क स्वत:च्या मृत्यूलाच आमंत्रण दिल्याचं चित्र समोर आले आहे. काय घडले नेमके?
ही स्टंटबाजी कि वेडेपणा?
गोदाकाठ परिसरातील कुरुडगाव शिवारात ऊस तोडणी चालु असताना बिबट्याचे बछडे आढळले. मात्र ऊस तोडणी कामगारांच्या पोरांनी या बछड्याला उचलून घेत यासोबत सेल्फी काढण्यासाठी आपले मोबाईल बाहेर काढून फोटोसेशन केले. मात्र यावेळी परिसरात बिबट्याची मादी देखील होती. फोटोसेशन झाल्यानंतर या बिबट्याच्या बछड्यांना पुन्हा ऊस तोडणी कामगारांनी मादीकडे सोडून दिले. आता ही हिम्मत म्हणावी कि वेडेपणा हे तुम्हीच ठरवा..
स्वतःवर आवर घालायला हवा
असले तरी आपला जीव धोक्यात घालून बिबट्याच्या बछड्या बरोबर सेल्फी काढणाऱ्यांनी स्वतःवर आवर घालायला हवा अन्यथा विपरीत घडायला वेळ लागणार नाही असे वन विभागाचे सुनील महाले यांनी बोलताना सांगितले आहे.
संपादन - ज्योती देवरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.