Nashik: रिक्षातून शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक; वाहतूक पोलिस, प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष

Dangerous transportation of school students by rickshaws
Dangerous transportation of school students by rickshawsesakal
Updated on

Nashik News : रिक्षातून होणाऱ्या अमर्याद प्रवासी वाहतुकीला आळा बसावा, यासाठी मुजोर रिक्षाचालकांविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही. तर, दुसरीकडे देशाचे उद्याचे भविष्य म्हणून ज्या शालेय मुलांकडे पाहिले जाते, त्यांच्या जिवाशी खेळण्याचा मुजोरपणा रिक्षाचालकांनी चालविला आहे.

याकडेही शहर वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने सोईस्कर काणाडोळा केला आहे. (Dangerous transportation of school students by rickshaws Neglect of Traffic Police Regional Transport Department Nashik)

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याची रिक्षाचालकांना परवानगी नाही. तरीही शहरात एका रिक्षात चिमुकल्या जिवांना अक्षरश कोंबून वाहतूक केली जात आहे. क्षमतेच्या तीन ते चारपटीने विद्यार्थी रिक्षांमध्ये बसवून वाहतूक केली जाते.

दुर्दैवाने एखादी घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल जागरूक नागरिकांकडून विचारला जात आहे, ज्याकडे कोणाचेही लक्ष नाही हेही तितकेच खरे. शहरात महापालिका, अनुदानित-विनाअनुदानित संस्था, इंग्रजी माध्यमांच्या प्ले स्कूलपासून ते प्राथमिक- माध्यमिक माध्यमांच्या शाळा आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dangerous transportation of school students by rickshaws
Nashik News: गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याचा ठराव; जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्याचा बैठकीत निर्णय

यातील बहुतांश शाळांकडे त्यांच्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठीच्या स्व:मालकीची वाहने आहेत. शहरात शाळा भरण्याच्या वा सुटण्याच्या वेळी खासगी रिक्षाचालकांची गर्दी दिसून येते. या वाहनांतून प्रमाणापेक्षा अधिक क्षमेतेने विद्यार्थ्यांची वाहतूक अत्यंत असुरक्षितरीत्या केली जात असल्याचे दिसून आले आहे.

रिक्षामध्ये फ्रंट सीट प्रवासी वाहतूक करण्यास सक्त मनाई आहे. तसे करणे वाहतूक नियमांचे उल्लंघन आहे. असे असतानाही शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून फ्रंट सीटवर विद्यार्थ्यांना बसवून धोकादायकरीत्या प्रवास केला जात आहे.

यातून एखादी दुर्दैवी घटना घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तरी क्षमेतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी होते आहे.

Dangerous transportation of school students by rickshaws
Nashik News: टोमॅटो पिकावर CCTVची नजर! कोकणगावच्या शेतकऱ्याचा नवा फंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.