नाशिकचा कांदा वेगळ्या प्रयोगांतून चर्चेत! शेतकऱ्याचा प्रयोग

onion
onionesakal
Updated on

चांदवड (जि.नाशिक) : कांदा पीक तसे जुगारीच... कधी हसविणारे, तर कधी रडविणारे... गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे राजकारण हलविणारा नाशिकचा कांदा आता वेगळ्याचे प्रयोगांतून चर्चेत आला आहे. दरेगावचे शेतकरी कौतिक जाधव यांनी आपल्या शेतात कांदा पेरणीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

नाशिकचा कांदा - पंचक्रोशीत चर्चेचा विषय

चांदवड तालुक्यातील दरेगावच्या कौतिक जाधव या शेतकऱ्याने पेरणी केलेल्या लाल कांद्याला तीन हजार १३१ रुपये दर मिळाल्याने पंचक्रोशीत हा चर्चेचा विषय बनला आहे. पारंपरिक पद्धतीने कांदालागवड न करता खरीप हंगामातील कांद्याची एक एकर क्षेत्रावर पेरणी केली होती. ७ जूनला पेरणी केलेल्या कांद्याचे उत्पादन येईपर्यंत त्यांना नेहमीपेक्षा खर्चही कमी आला व कांदा काढणीही लवकर झाली. कांद्याची पेरणी केल्यामुळे त्यांचा कांदा लागवडीसाठी येणारा जवळपास दहा हजार रुपये खर्चही वाचला. शिवाय औषधे व रासायनिक खतांचा खर्चही कमी झाला. जाधव यांनी या कांद्यावर रासायनिक खतांचा वापर केलेला नाही. त्यामुळेच कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला नसल्याचा दावाही जाधव यांनी केला. अत्यंत कमी खर्चात त्यांनी कांद्याचे उत्पादन घेतल्याने त्यांच्या या प्रयोगाची आज सर्वत्र चर्चा होती.

onion
नाशिक : राज ठाकरेंच्या 'बालेकिल्ल्यातच' प्रवास खडतर !

लाल कांद्याला तीन हजार १३१ रुपये दर

चांदवड तालुक्यातील दरेगावच्या कौतिक जाधव या शेतकऱ्याने पेरणी केलेल्या लाल कांद्याला तीन हजार १३१ रुपये दर मिळाल्याने पंचक्रोशीत हा चर्चेचा विषय बनला आहे.कांदा पिकासाठी रोप तयार न करता पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरणी केली होती. कांदा तयार होऊन काढणी केली असता उमराणेजवळील खारी फाटा येथील रामेश्‍वर कृषी मार्केटमध्ये या लाल कांद्याचे स्वागत करण्यात आले. कांदा पाहणी करण्यासाठी व्यापारी व शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. यावेळी कांदा वाहनांची पूजा करून उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी संगम फार्मर यांनी सर्वोच्च तीन हजार १३१ रुपये बोली लावून कांद्याची खरेदी केली. कांद्याचे वजन २५ क्विंटल ४० किलो इतके भरले. सुरवातीलाच खर्च वजा जाता ७९ हजार २९७ रुपये शेतकऱ्याच्या पदरात पडले.

मी कांदा पेरणीचा केलेला प्रयोग यशस्वी झाला असून, यासाठी खर्चही कमी आला आहे. यापुढेही कांदा पेरणी करून चांगले उत्पादन काढणार आहे.

-कौतिक जाधव, प्रयोगशील शेतकरी, दरेगाव

onion
दोस्तीचा हात कायमचा सुटला; सिन्नर शिर्डी रस्त्यावरील घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()