जुने नाशिक : शहरात झालेल्या पहिल्याच पावसाने (First Rain) नागरिकांची तारांबळ उडाली. तर, दुसरीकडे वीजपुरवठा खंडित (Power Supply Interrupted) झाल्याने सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरले होते. आगामी दिवसात काय होणार, असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये, तसेच कुठली दुर्घटना घडता कामा नये, यासाठी वीज वितरण विभागाकडून (MSEDCL) पावसाळापूर्व कामे हाती घेतली होती. वीजपुरवठा खंडित होणार नाही. या आशेने नागरिकांनीदेखील समाधान व्यक्त केले होते. परंतु झाले विपरीतच. (Darkness in city on first pre monsoon rain Nashik News)
गुरुवारी (ता. ९) सायंकाळच्या सुमारास झालेल्या पहिल्याच पावसाने वीज वितरण विभागाच्या कामाचे धिंडवडे उडवले आहेत. पाऊस सुरू होताच शहराच्या विविध भागातील वीजपुरवठा खंडित झाला. सर्वत्र काळोख दिसून येत होता. एखादा दुसऱ्याच्या घरात इन्वर्टर तसेच इमर्जन्सी लाइट असल्याने केवळ त्यांच्या घरातच प्रकाश बघावयास मिळाला. सर्वांनाच इन्व्हर्टर बसविणे शक्य नसल्याने त्यांच्या घरात मात्र अंधार पसरला होता. अनेक भागात रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित होता. सर्वांच्या नजरा केवळ वीजपुरवठा केव्हा सुरळीत होतो, याकडे लागून होत्या. पहिल्याच पावसात जर अशी परिस्थिती असेल अन्य पावसाळ्याचे तीन ते चार महिने काय परिस्थिती होईल. अशा प्रकारची चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती. पावसाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होणार नाही. याची काळजी वीज वितरण विभागाने घ्यावी. अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
मेणबत्तीची वाढली मागणी
पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. सायंकाळच्या सुमारास स्वयंपाक करण्यासह विविध प्रकारची घरगुती कामे असतात. अंधारात कामे करणे शक्य नसल्याने तसेच घरात थोडातरी प्रकाश असावा. यानिमित्ताने नागरिकांचा कल मेणबत्ती खरेदीकडे दिसून आला. मागणी वाढल्याने किराणा दुकानांमध्ये मेणबत्ती खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
व्यावसायिकांची गैरसोय
चार- सहा मिनिटांकरिता वीजपुरवठा कार्यान्वित झाल्यानंतर पुन्हा दहा- पंधरा मिनीटे वीजपुरवठा खंडित होत होता. तर, काही भागांमध्ये दीर्घ कालावधीसाठी वीजपुरवठा खंडित झाला होता. ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढलेला असताना बत्ती गुल झाल्याने नागरिकांकडून मनस्ताप व्यक्त केला जात होता. रहिवासी भागाप्रमाणे मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, शिवाजी रोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा आदी भागांमध्येही विजेचा लपंडाव सुरू राहिला. व्यवसायाच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यावसायिकांची गैरसोय झाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.