Dasara Shastra Pujan 2022 : पोलिस आयुक्तालयात विधीवत शस्त्रपूजन

Shastra Pujan
Shastra Pujanesakal
Updated on

नाशिक : कायदा व सुव्यवस्था हाताळताना कोणत्याही परिस्थितीत पोलिसाना अत्याधुनिक शस्त्रे वापरायची गरज पडू नये, अशी भावना व्यक्त शहर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी केली. बुधवारी (ता.५) सकाळी शहर पोलिस मुख्यालयात परंपरेनुसार आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. (Dasara Shastra Pujan 2022 Ritual weapon worship at Police Commissionerate nashik Latest Marathi News)

Shastra Pujan
Ravan Dahan 2022 : गांधीनगरला आज 58 फुटी रावणदहन; यंदा 67वे वर्ष

या वेळी आयुक्त नाईकनवरे म्हणाले, पोलिस मुख्यालयात परंपरेनुसार विजयादशमीनिमित्त शस्रागारासह विविध शस्त्रांची पूजा केली जाते. ही परंपरा चांगली असून ती जपली जात आहे. दरम्यान, शहर पोलिस मुख्यालय व आडगाव येथील ग्रामीण पोलिस मुख्यालयात दसऱ्यानिमित्त विधीवत शस्त्रपूजन करण्यात आले.

या वेळी गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड, परिमंडळ एकचे उपायुक्त अमोल तांबे, मुख्यालयाच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले- श्रींगी, परिमंडळ दोनचे उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त, पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे, आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते पोलिस शस्त्रांचे विधीवत पूजन करण्यात आले.

या वेळी अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते. त्याप्रमाणे पोलिस ठाण्यांमध्ये शस्त्रांचे विधीवत पूजन करण्यात आले. मुख्यालयात पारंपारिक पद्धतीने विविध शस्त्रांची मांडणी करण्यात आली होती. त्यात अत्याधुनिक एके- ४७, एमीपी- ५, एसएलआर, पिस्तूल, ब्लॉक पिस्तूल, अॅटो पिस्तूल, पॉइंट ३. ८ रिव्हॉल्व्हरसह काडतुसे मांडण्यात आली होती.

Shastra Pujan
Horse Market : 61 लाखांच्या घोडीने वेधले लक्ष; लाखोंची उलाढाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.