Nashik News : दत्ता पाटील यांच्या ‘कलगीतुरा’ चा डंका! दर्पण लेखन प्रकल्पात अव्वल

The cast along with the NCPA chief after the play Kalgitura by Datta Patil won the first prize
The cast along with the NCPA chief after the play Kalgitura by Datta Patil won the first prizeesakal
Updated on

Nashik News : भारतीय कलावर्तुळात सन्मानाचे स्थान असलेल्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट, मुंबई (एनसीपीए) संस्थेने २०२२-२३ या वर्षासाठी नुकत्याच आयोजित केलेल्या दर्पण या मराठी नाट्यलेखन उपक्रमात अंतिम फेरीत दत्ता पाटील लिखित कलगीतुरा हे नाटक विजेते ठरले आहे.

नाशिककर कलावंतांच्या सहभागाचे हे नाटक सचिन शिंदे दिग्दर्शित करीत असून, या नाटकाची निर्मिती एनसीपीए करणार आहे. शिवाय एनसीपीएच्या अतिशय प्रतिष्ठित प्रतिबिंब ५ ते ७ मे दरम्यान होणाऱ्या मराठी नाट्योत्सवाचा शुभारंभ कलगीतुरा या नाटकाने होणार आहे. (Datta Patils Kalgitura Darpan tops writing project Nashik News)

विजेते लेखक दत्ता पाटील यांना रुपये ५० हजाराचा पुरस्कार एनसीपीएने जाहीर केला आहे. एनसीपीए, मुंबई येथे बुधवारी (ता.१२) झालेल्या पत्रकार परिषदेत एनसीपीएचे चित्रपट व नाट्यविभाग प्रमुख ब्रूस गुथ्री व कार्यक्रम विभागाच्या सहव्यवस्थापक राजेश्री शिंदे यांनी ही घोषणा केली.

या वेळी कलगीतुरा नाटकातील काही प्रवेश सादर करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री अमृता सुभाष, अभिनेता व दिग्दर्शक संदेश कुलकर्णी उपस्थित होते.

दर्पण नाट्यसंहिता निवड प्रक्रियेसाठी तज्ञ मार्गदर्शक व परीक्षक म्हणून नाटककार शफाअत खान, दिग्दर्शक प्रतिमा कुलकर्णी, लेखिका रेखा इनामदार साने, लीला हडप यांनी काम पाहिले. ‘कलगीतुरा’ नाटक रंगभूमी गाजवायला ५ मेपासून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

The cast along with the NCPA chief after the play Kalgitura by Datta Patil won the first prize
Civil Hospital: पिण्याच्या पाण्याचे सदोष नमुने निघाल्यानंतर जिल्हा रूग्णालयातील जलकुंभाची साफसफाई!

"गेली अनेक वर्ष आम्ही कलगीतुरा या लोककला प्रकारावर अभ्यास करतोय. या विषयावर व्यावसायिक नाटक करण्याची संधी 'एनसीपीए'कडून मिळणे ही एक दिग्दर्शक म्हणून मोठी आनंदाची व जबाबदारी वाढवणारी घटना आहे. एनसीपीएने अनेक संहितांमधून 'कलगीतुरा' नाटकाची निवड करने ही आमच्या टीमच्या दृष्टीने फार सन्मानाची बाब आहे."

- सचिन शिंदे, दिग्दर्शक

"अनेक संहितामधून कलगीतुरा ही संहिता निवडप्रक्रियेतील विविध टप्पे पार करत अंतिम विजेती ठरल्याचा आनंद आहेच. मुख्य म्हणजे जगण्याची मूल्ये ठासून भरलेल्या परंपरांवर आधारलेली कलाकृती एनसीपीएसारख्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या वतीने व्यावसायिक रंगभूमीवर येते आहे, याचा जास्त आनंद आहे. दिग्दर्शक सचिन शिंदे आणि संपूर्ण टीम यांच्या कष्टातून हे व्यावसायिक नाटक मराठी रंगभूमीवरचा मैलाचा दगड ठरेल यात शंकाच नाही."

- दत्ता पाटील, लेखक

The cast along with the NCPA chief after the play Kalgitura by Datta Patil won the first prize
Nashik News : शासकीय निधी खर्चाला त्रैमासिक अट; प्रत्येक तिमाहीत निधी खर्चाचे वित्त विभागाचे आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.