निमगाव (जि. नाशिक) : मेहुणे (ता. मालेगाव) येथील शुभांगी अहिरे सैन्य दलात दाखल झाली आहे. तिने नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणानंतर गावी आलेल्या शुभांगीचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले.
सैन्यदलात दाखल झालेली शुभांगी ही मालेगावसह कसमादेतील पहिलीच कन्या आहे. तिच्या या यशामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. (Daughter of Mehune village joins army Malegaon taluka got first honor Success Story nashik news)
आई वनिता आणि वडील बाळू अहिरे या शेतकरी दाम्पत्याने शेती व्यवसाय सांभाळत तीन मुली व एक मुलगा यांना शिकविले. कुटुंबात शुभांगी मोठी मुलगी. तिचे प्राथमिक शिक्षण मेहुणे येथे तर दहावीपर्यंतचे शिक्षण टीकेआरएच विद्यालय निमगाव येथे झाले.
तिने वाणिज्य विभागाची पदवी मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयातून घेतली. आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही आई वडिलांनी दिलेली साथ तिने सार्थ ठरविली.
शिक्षण घेत असताना कराटे, एनएनसीत तिने प्रावीण्य मिळविले होते. २०१८ मध्ये ती लष्करात भरती झाली. परंतु कोरोना महामारीमुळे प्रशिक्षणासाठी दाखल झाली नाही. मार्च २२ मध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाली आणि जानेवारी २३ मध्ये तिचे प्रशिक्षण पूर्ण झाले.
हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शुभांगी पहिल्यांदाच गावात आल्याने स्वागतासाठी मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक घरी तिचे औक्षण करण्यात आले. यावेळी गावातील सरपंच, ग्रामसेविका, तलाठी, शिक्षक, प्रशांत देवरे, बबलू देवरे, महेंद्र देवरे, गणेश बच्छाव, अतुल लोढा, माजी सरपंच आबासाहेब देवरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"सर्वसामान्य कुटुंबातील पहिली महिला सैन्य दलात दाखल होण्याचा मान मिळाला. आई वडिलांचे व गावाचे नाव मोठे करण्याचा माझा प्रयत्न आहे. देशसेवा करण्याची संधी मिळाली. देशसेवेचे माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईने माझ्याशी मैत्रीचे नाते निर्माण केले. या यशात तिचा सिंहाचा वाटा आहे." - शुभांगी अहिरे
"शुभांगी धाडसी व हुशार आहे. सैन्यदलात दाखल झाल्याने संपूर्ण गावाला तिचा अभिमान आहे. शुभांगीने तालुक्यासह जिल्ह्यातील इतर मुलींपुढे आदर्श घालून दिला आहे. ग्रामस्थांतर्फे लवकरच तिचा नागरी सत्कार केला जाईल." - शोभा देवरे, सरपंच, मेहुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.