Adhik Maas 2023: रामतीर्थावरील गर्दीत दिवसेंदिवस वाढ! अधिक मासातील शेवटचा आठवड्यात स्नानासह वाणासाठी गर्दी

Devotees thronged on Tuesday as it was the last week of the month of Madhyam.
Devotees thronged on Tuesday as it was the last week of the month of Madhyam.esakal
Updated on

Nashik News : अधिक श्रावण संपण्यास अद्याप आठवडा शिल्लक आहे. परंतु हे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी गोदाघाटावरील गर्दीत दिवसेंदिवस वाढच होत आहे.

दरम्यान तयार वाणासाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याने अनेक गृहिणींनी घरूनच वाण आणण्यास पसंती दिली आहे. दरम्यान रामतीर्थावरील गर्दीमुळे दिवसभर वाहतूक कोंडी अनुभवण्यास मिळत आहे. (Day by day increase in crowd on Ram Teertha last week of month more rush to vaan with bath Nashik News)

मोजके दिवस शिल्लक राहिल्याने रामतीर्थावरील गर्दीत मोठी वाढ झाली आहे. आधीच चिंचोळा असलेल्या या परिसरात रिक्षा, दुचाकी, रस्त्यावरील व्यावसायिक यांनी अतिक्रमण केल्याने दिवसभर वाहतूक कोंडी अनुभवण्यास मिळत आहे.

दरम्यान, भाविकांच्या गर्दीने रामतीर्थासह विविध मंदिरे फुलून गेली आहेत. रामतीर्थावर सकाळच्या सुमारास दशक्रियांसह अन्य विधीसाठी गर्दी असते. अधिकमासामुळे या गर्दीत दुप्पट वाढ झाली आहे. येथील पोलिस चौकीचे काम वादात सापडल्यापासून येथील बंदोबस्तही दिसत नाही.

घरूनच वाणाची तयारी

सध्या बाजारात वीस रुपयांपासून चाळीस रुपयांपर्यंत रेडिमेड वाण उपलब्ध आहे. हिंदू धर्मात देवदेवतांची संख्या अधिक असल्याने प्रत्येक ठिकाणी वाण विकत घेणे अनेक महिलांनी शक्य नसते.

या महिला घरीच वाणाचे सर्व साहित्य खरेदी करून स्वतःच वाण तयार करतात, त्यामुळे पैशांची बचत होत असल्याचे काही महिलांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एकेरी मार्ग बनले दुहेरी

एकेरी मार्ग असल्याने रामतीर्थाकडून मालेगाव स्टॅन्डकडे जाता येत नाही. तसा फलकही या ठिकाणी लावण्यात आला आहे. परंतु तरीही दुचाकी, चारचाकी वाहनेही बिनदिक्कत एकेरी मार्गावर जातात.

विशेष म्हणजे येथे उपस्थित असलेला वाहतूक शाखेचा कर्मचारीही अशा वाहनधारकांना हटकत नाही. त्यामुळे मालेगाव स्टॅन्डवरील सिग्नल व्यवस्थेचाही फज्जा उडतो.

रामतीर्थाकडून पंचवटी किंवा मालेगाव स्टॅन्डकडे जाणारी वाहने कपालेश्‍वर किंवा पंचवटी सार्वजनिक वाचनालयकडून वरच्या बाजूला जाणे अपेक्षित आहे. परंतु या ठिकाणी पोलिस कर्मचारी उपस्थित असूनही वाहने थेट एकेरी मार्गात शिरतात

Devotees thronged on Tuesday as it was the last week of the month of Madhyam.
Nashik Drama Competition: नाट्य स्पर्धांमध्ये नवीन संहितांवरच भर! बाल 3, राज्य नाट्यात 8 नवीन नाटके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.