De listing Melava : ‘डी-लिस्टिंग’ महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात आदिवासी बांधवांनी ‘जो महादेव का नही, वो हमारे जात का नही’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
या मोर्चामुळे शहरातील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली असली, तरी वाहनचालकांना कोंडीमुळे मनस्तापाला सामोरे जावे लागले. मोर्चासाठी शहर पोलिस आणि वाहतूक शाखेकडून कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. (De listing Melava Traffic congestion on alternative routes nashik)
अखिल भारतीय जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीने गोल्फ क्लब मैदान येथे ‘डी-लिस्टिंग’ महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते.
तत्पूर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार ॲड. राहुल ढिकले, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोर्चाला रविवारी (ता. २९) सकाळी साडेअकराच्या सुमारास गोल्फ क्लब येथून प्रारंभ झाला.
मोर्चाच्या अग्रभागी बुलेटस्वारांची रॅली होती. त्यापाठोपाठ मोर्चा त्र्यंबक नाका, जिल्हा परिषद रोडने शालिमार चौक, सारडा स्कूल, एमजी रोडने मेहेर सिग्नलकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून सीबीएस सिग्नलवरून पुन्हा त्र्यंबक नाक्यावरून गोल्फ क्लब मैदान येथे पोहोचला.
मोर्चादरम्यान सहभागी आदिवासी बांधवांकडून घोषणाबाजी करण्यात आल्या. मोर्चात नाशिकसह अहमदनगर, पुणे जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदविला होता.
एक भोवळ येऊन पडला
रविवारी दुपारी मोर्चाला प्रारंभ झाला असता, कडाक्याचे ऊन होते. त्या वेळी मोर्चात सहभागी झालेला एका तरुणाला भोवळ आली आणि तो रस्त्यावर पडला. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस व मोर्चेकरूंनी त्यास तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले.
पर्यायी मार्गांवर कोंडी
मोर्चा मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पर्यायी मार्गांनी वळविण्यात आलेली होती. त्यासाठी त्र्यंबक रोडवरील जलतरण तलाव सिग्नल, गडकरी चौक, सारडा सर्कल, रेडक्रॉस सिग्नल याठिकाणी बॅरिकेडिंग करून मोर्चा मार्गाकडे जाणारी वाहतूक रोखण्यात आली.
त्यासाठी पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यासाठी वाहतूक पोलिस तैनात होते. ठक्कर बझार बसस्थानकाकडे जाणाऱ्यांना मात्र मनस्तापाला सामोरे जावे लागले. डॉक्टर हाउससमोर मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
तसेच, टिळकवाडी रोडवरही वाहतूक कोंडी झाली. मोर्चा पुढे मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक सुरू केली जात होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.