Jindal Fire Accident: जिंदाल अग्नितांडवातील ढिगाऱ्याखाली एक मृतदेह आढळला! अजूनही 83 कामगार बेपत्ता

Jindal Fire Accidnt
Jindal Fire Accidntesakal
Updated on

अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील सर्वाधिक रोजगार देणारा व जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प अशी ख्याती असणाऱ्या जिंदाल पॉलिफिल्म कंपनी जळीतकांडातील ढिगाऱ्याखाली सुधीर मिश्रा नामक मृत कामगाराचा मृतदेह आढळून आला आहे. अजूनही तब्बल ८३ कामगार बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (dead body found under debris of Jindal fire accident 83 workers still missing nashik news)

रविवार ता.१ रोजी भीषण स्फोटानंतरच्या अग्नितांडवा दरम्यान कंपनीत उपस्थित असलेल्या कामगारांच्या पटसंख्येवरुन सद्या कंपनीत उपस्थित कामगार अन दुर्घटनेत जखमी असलेले जे सद्यस्थितीत रुग्णालयात उपचार घेत आहेत यांच्या संख्येत तफावत दिसून येत असून तब्बल ८३कामगार बेपत्ता आढळून आल्याचे समजते आहे. कंपनी मृतांची खरी आकडेवारी दडवित असल्याची चर्चा तालुकाभरातील नागरिकांमध्ये सुरु आहे.

याबाबत निवृत्त न्यायाधीशांची समिती गठित करुन सखोल चौकशी करण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाने आक्षेप घेत जिल्हाधिकारी दि गंगाधरन यांना निवेदन दिले आहे. खासदार हेमंत गोडसे यांनीही आज बुधवार ता.३ रोजी कंपनीला भेट देत पाहणी केली आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

Jindal Fire Accidnt
Jindal Fire Accident : चौकशी अहवाल येईपर्यंत जिंदाल पॉलीफिल्म कंपनीचे उत्पादन बंदचे आदेश!

कंपनी प्रशासनाकडून परप्रांतीय कामगारांवर दबाव

जळीतकांडाच्या घटनेनंतर मृतांची आकडेवारी कंपनी प्रशासनाकडून दडवली जात असल्याची तालुकाभरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.

याबाबत प्रसारमाध्यमा समोर कुठल्याही प्रकारे वाच्यता करायची नाही असा सज्जड दम कंपनी प्रशासनाकडून कामगारांना दिला असल्याचीही बाब समोर आली आहे. आपला रोजगार जाईल या भीतीपोटी परप्रांतीय कामगारही घटनेबद्दल मौन बाळगून आहे.

Jindal Fire Accidnt
Dhule Crime News: वि‍श्‍वस्तासह कामाठीवर गुन्हा दाखल; आदिवासी सेवा मंडळ संस्थेच्या फसवणुकीचे प्रकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.